शिवसेना जिल्हा चंद्रपूर वरोरा तालुका आयोजित चिकणी येथे भव्य नेत्र तपासणी व आरोग्य तपासणी शिबीर.

वरोरा :- ( चिकणी ) छत्रपती शिवाजी महाराज हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिम्मित शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रपूर तथा जिल्हा खनिज प्रतिष्ठान सदस्य चंद्रपूर नितीनभाऊ मत्ते यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना जिल्हा चंद्रपूर तालुका वरोरा व लोककल्याण आरोग्य केंद्र मुंबई ठाणे यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित दिनांक 18 ऑगस्ट 2021 रोज बुधवारला चिकणी येथे भव्य नेत्र तपासणी शिबीर व भव्य आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. त्यावेळी शिबीराला गावातील नागरिकांचा उत्स्फूर्द प्रतिसाद मिळाला. 280 लोकांनी शिबीराचा लाभ घेतला त्यामध्ये 120 लोकांना चष्मे वाटप करण्यात आले. त्यामध्ये 4 वर्षांपासून 75 वर्षापर्यंत व्यक्तींनी तपासणी करून शिबिराचा लाभ घेतला. लोक कल्याण आरोग्य केंद्र मुंबई यांच्या टीमने उत्कृष्ट पद्धतीने तपासणी करून मोफत औषधी दिली,स्वतः शिवसेना तालुका प्रमुख वरोरा मुकेशभाऊ जिवतोडे यांनी शिबीर मधे दखल देऊन तपासणी मधे लक्ष घातले. तसेच जनतेच्या आरोग्याची विचारणी केली. चिकणी येथे शिबीरला शिवसेना तालुका प्रमुख वरोरा मुकेशभाऊ जिवतोडे, शिवसेना नगरसेवक वरोरा दिनेशभाऊ यादव, शिवसैनिक अविनाश कार्लेकर , आकाश चतुरकर सामजिक कार्यकर्ते राजेंद्रजी माथनकर ग्राम. सदस्य नाना पारधे गावातील युवा नागरिक अनिकेत कार्लेकर , चेतन झाडे , अमोल जाधव भूषण डाखोरे , कपिल डाखोरे , पवन चतुरकर , सागर उरकुडे , आकाश कार्लेकर राहुल भोस्कर हे सर्व शिवसैनिक, गावातील नागरिक उपस्थित असून शिबीराला हातभार लावला .