
समुद्रपुरतालुका अध्यक्षपदी गौरव मांडवकर तर #उपाध्यक्ष पदी अमोल सवई यांची नियुक्ती!
वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद सातत्याने सर्व स्तरातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रश्नासंदर्भात पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी लढणारी व सोबतच आपल्या वैचारिक चळवळीच्या माध्यमातून आपल्या कक्षाची विचारधारा समाजातील तळागाळापर्यंत पोहोचवून समाजातील प्रत्येक घटकाचे जीवनमान उंचावण्यासाठी सतत कार्य करणारी संघटना म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर नावलौकिक आहे. या दरम्यान वर्धा जिल्ह्यात आणि संपूर्ण महाराष्ट्रात संघटना कशा प्रकारे कार्य करत आहे आणि त्या संपूर्ण कार्याचा एक छोटा आढावा जिल्हा संघटक अक्षय इंगोले यांनी युवकांसमोर मांडला.समुद्रपूर तालुक्यातील अनेक युवकांनी संघटनेचे कार्य व विचाराने प्रेरित होऊन संघटनेचे विधानसभा अध्यक्ष अक्षय भास्कर थुटे यांच्या नेतृत्वात संघटनेत प्रवेश घेतला.यावेळी समुद्रपूर तालुका अध्यक्षपदी गौरव प्रभाकरराव मांडवकर, उपाध्यक्ष अमोल सवई तर सदस्य म्हणून निखिल जामूनकर, अभिजीत चतुर, आकाश चट्टे, निखिल थुल, अथर्व येलेकर, धम्मदीप गावंडे आणि समस्त सदस्य आदी युवकांची नियुक्ती करण्यात आली यावेळी वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे जिल्हा संघटक अक्षय इंगोले,जिल्हा उपाध्यक्ष(उत्तर व पूर्व) धनंजय जाधव व किशोर तांदुळकर, विधानसभा अध्यक्ष अक्षय भास्कर थुटे, हिंगणघाट तालुका अध्यक्ष दिनेश काटकर, गौरव गोहाडे,शुभम घोडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
