

तरुण तडफदार युवा नेतृत्व जितूबाबु कहुरके यांच्या प्रयत्नाला यश
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर(9529256225)
जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा धानोरा येथे महिला बालकल्याण सभापती जयाताई राजुभाऊ पोटे यांनी एक लाख रुपयांचा निधी शाळेच्या पटांगणात गंटु बसविण्यासाठी दिला आहे. या निधीसाठी युवा व तडफदार नेतृत्व जितुबाबू कहुरके यांनी वारंवार भेटी व दूरध्वनीवरून जयाताई यांचे पती राजूभाऊ यांच्या सतत संपर्कात राहून निधीविषयी मागणी करत होते व त्यांच्या प्रयत्नाला यश मिळत मार्च 2021 मध्ये जिल्हा परिषद केंद्र शाळा धानोरा यांना एक लाख रुपयांची निधी मिळवून दिली. परंतु गावात तो म्हणते मी आणला तो म्हणते मी आणला असा गावात कलगीतुरा सुरू आहे. महिला व बालकल्याण समिती सभापती कर्तव्यदक्ष जयाताई राजू भाऊ पोटे त्याच सांगू शकतात कोणाच्या प्रयत्नाने दिला.
