आता तरुणांनी राजकीय पक्षांच्या गुलामगिरी ला बळी न पडता ” माझं ग्राम माझं स्वराज्य” अभियान सुरू केले पाहिजे :- मधुसूदनजी कोवे गुरुजी

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

आता तरुणांनी ग्राम स्वराज्य अभियानात सहभागी होवून ” आपलं गाव आपली जबाबदारी ” हे अभियान मराठवाडा मुक्ती संग्राम दिना निमित्त राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सुरु केले होते गावातील तरुणांना स्फूर्ती देण्यासाठी आणि ग्राम स्वराज्य निर्माण करण्यासाठी या अभियानात वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज उत्तरले होते.

राजकीय पक्ष कोणाचा वाढदिवस आणि कसा साजरा करायचा आणि कोणासाठी अभियान सुरू करायचं ही “झुटी गुलाम शाही” आहे. गावं ओस पडली आहे.तरुणाच्या हाताला काम नाही.राजकीय पक्षानी सारा तरुण युवक आप आपल्या दावणीला बांधून गुलाम बनविले आहे.या राजकीय पक्षांच्या गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी स्वतःमध्ये
“माझं गावं माझं स्वराज्य”
ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांची मशाल घेऊन “ग्राम स्वराज्य निर्माण करण्यासाठी ग्राम अभियान सुरू केले आहे”

राजकीय पक्ष गावातील लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे परंतु गावात आपली व्होट बँक निर्माण करण्यासाठी गावा गावात जाऊन लोकांमध्ये फुट पाडण्यासाठी प्रयत्न करत आहेत म्हणून तरुणांनी आणि गावातील लोकांनी आपल्या गावाचं रक्षण आपल्या ला करायला पाहिजे “गावं करी ते राव न करी” ही भावना मनात आणुन”माझं गाव माझं स्वराज्य” निर्माण करण्यासाठी तरुणांनो पुढे या……..!!

तरुणांनो राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात सेवा करायची असेल तर गावातील दिनदुबळ्याची करा समर्पण द्यायचे असेल तर ग्राम स्वराज्यासाठी द्या हेच ग्राम विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे “ग्राम स्वराज्य सेवा समर्पण अभियान “आहे हेच अभियान वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी मराठवाडा मुक्ती दिनाच्या निमित्ताने गावा गावात जाऊन ग्रामसभा घेऊन भजनी मंडळ युवक मंडळ महिला मंडळ तयार करून राबविण्यात आले होते.