धक्कादायक: गांधी चौकात चायनीज च्या दुकानावर राडा,एक गंभीर

वरोरा शहरातील गांधी चौक येथील एका चायनीज सेंटर वर काल दिनांक18 सप्टेंबर 2021 रोजी सायंकाळी 9 वाजताच्या सुमारास नवीन वस्ती येथील काही युवक गोंधळ घालत होते त्यावेळी दुकान चालक सोनू याने शाहिद शेख रा.नवीन वस्ती ,वरोरा यास फोन करून मदतीकरिता बोलावले .मात्र गोंधळ घालणाऱ्या युवकांना समजावत असताना आर्यन नावाच्या एका अल्पवयीन युवकाने काही न बघता शाहिद सोबत आलेल्या इम्रान अली (वय वर्ष 21) याच्या डोक्यावर बाटली फोडून गंभीर जखमी केले .त्यानंतर दीपक हिवरे (45)याला कुणाल शिवरकर (20) रा.नवीन वस्ती वरोरा याने लाकडी दांड्याने मारहाण केली.इम्रान अली यांनी झालेल्या घटनेची माहिती पोलीस स्टेशन येथे जाऊन फिर्याद नोंदविली .तर दीपक हिवरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कुणाल हिवरकर व सहकारी मित्रांवर एकमेकांविरोधात 324 ,504 ,34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. सोनू ने शाहिद शेख याला मदतीसाठी बोलविल्यावर त्याच्या सोबत असलेल्या इम्रान वर झालेल्या अचानक हल्ल्याने पोलिसांनी मात्र इम्रान वर ही गुन्हा दाखल केल्याने याची चर्चा आता सर्वत्र होत आहे.या संपूर्ण प्रकरणात शाहिद शेख याचा कुठेही उल्लेख झालेला नाही हि बाब प्रश्न चिन्ह उपस्थित करीत आहे.या प्रकरणी आरोपी म्हणून किरण गज्जलवार(वय 36 )यास अटक झाली आहे.घटनास्थळी उपस्थित असणाऱ्या साक्षीदारांच्या बयानाअंती गुन्हे दाखल करण्यात येईल असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.