चारगाव येथील गोठ्यात चक्क वाघाचे बस्तान,बघ्यांची गर्दी ,वनविभागाची चमू घटनास्थळी


नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण : वनविभागाची चमू घटनास्थळी
तृणभक्षी प्राण्यांची जंगलात कमतरता
शंकरपूर : वरोरा तालुक्यातील स्थानिक चारगाव ( बू) येथे रविवारी चक्क पावसामुळे वाघ गावात आल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातारण निर्माण झाले आहे. रविवारी दुपारच्या सुमारास वाघाने एका गोठ्यात आश्रय घेतला. वृत्त लिहिपर्यंत वाघ तिथेच ठाण मांडून आहे.
रविवारी दुपारपासूनच मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असून गावापासून वाहणारे नदी, नाले मोठ्याप्रमाणात भरून वाहत आहे. २ वाजतापासून मेघ गर्जनेसह मुसळधार पावसाने हजेरी लावली. तर या मेघगर्जनेत व भर पावसामध्ये शेत याच गोठ्यात वाघाने बस्तान मांडले आहे.शिवरातून गावात वाघ आला. गावात वाघ येताच लोकांनी एकच गोंधळ केला. त्यामुळे वाघाने चारगाव- वायगाव रस्त्यावरील संजय लाखे यांच्या जनावराच्या गोठ्यात बस्तान मांडले.

गोठ्यातील चारा ठेवण्याच्या ठिकाणी तो दडून बसला आहे. दरम्यान वाघ पाहण्यासाठी गावकऱ्यांनी एकच गर्दी केली आहे. वाघाला जेरबंद करण्याची कार्यवाही सध्या शेतकरी वाघ, बिबट व इतर हिस्र पाण्याच्या दहशतीत आहेत. उन्हाळ्यात वाघ, बिबट पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे येतात, अशी सर्वसामान्य नागरिकांचा समज होता. मात्र आता पावसाळ्यातही हे हिस्र
प्राणी गावात येत आहेत. निश्चित ते पाण्याच्या शोधात येत नाहीत. त्यामुळे जंगलातच त्यांचे खाद्य असलेल्या तृणभक्षी प्राण्यांची कमतरता झाली असावी, असे वाटते. सुरू असून वनविभागाची चमू व पोलीस घटनास्थळी उपस्थित होते.