माजरी गावाच्या मुख्य रस्त्यावर दिवस रात्र होणारी अवजड वाहतूक बंद :शुभम रॉय ,जिल्हा सचिव इंटक यांच्या मागणीला यश प्राप्त

प्रतिनिधी:वरून त्रिवेदी, वरोरा

मागील काही वर्षाआधी माजरी गावाच्या मुख्य रस्त्यावर वाहनाच्या धडकेत एका इसमाचा मृत्यू झाला होता.तेव्हा मुख्य रस्त्यावरील अवजड वाहनांची वाहतुकीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली होती. परंतु आता मागील दोन महिन्यांपासून होणाऱ्या अवजड वाहतुकीवर कोणतीही कारवाई होत नाही .त्यामुळे अवजड वाहतूक करण्याऱ्या वाहनमालकाला प्रोत्साहन मिळत आहे. माजरी गावाच्या मुख्य रस्त्यावर क्षमतेपेक्षा अधिक असलेल्या हायवा ट्रक व अन्य अवजड वाहनांवर बंदी घालण्यात यावी या मागणीसाठी अखिल भारतीय ट्रान्सपोर्ट काँग्रेस युनियन चे जिल्हा सचिव शुभम रॉय यांनी माजरी पोलीस स्टेशन चे ठाणेदार यांनी 29/11/20 ला निवेदन दिले होते. त्यांच्या मागनिला आज दिनांक 15/11/20 रोजी यश प्राप्त झाले, माजरी पुलिस स्टेशन ठाणेदार यांनी कारवाही सुरु केली असुन,माजरी ग्रामस्थानी शुभम रॉय जिल्हा सचिव इंटक यांचे आभार मानले.