

पाण्याचा निचरा व अयोग्य व्यवस्थापनाचा नागरिकांना फटका
प्रतिनिधी:जुबेर शेख,वरोरा
आज सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान पडलेल्या मुसळधार पावसाने वरोरा शहरातील प्रभाग क्रमांक 11 मधील गीताश्री मंगल कार्यालयाजवळ असलेल्या पुलाला पाणी आल्यास नाल्याच्या वर पाणी येत या भागातील नागरिकांच्या अंगणापर्यंत पाणी येते.या नाल्याच्या पाण्याने रोगांचा प्रसार होण्याची शक्यता आहे .मागील कित्येक वर्षांपासून या भागातील नागरिक या नाल्याच्या समस्यांमुळे त्रस्त आहेत .वरोरा नगर परिषदेकडून मात्र यावर काहीच उपाययोजना केली जात नाही .गीताश्री मंगल कार्यालयाजवळ असलेल्या नागरिकांनी प्रभागाच्या नगर परिषद सदस्याला वारंवार समस्या सांगितली असताना देखील या कडे कोणताही सदस्य लक्ष देत नसल्याचे या भागातील नागरिकांनी सांगितले.या नाल्याला नवीन वस्ती या भागातून पाणी येत असल्याने गीताश्री मंगल कार्यालयाच्या जवळ असलेल्या पुलाची उंची कमी असल्याने पूर्ण पूल हा पाण्याखाली असतो तसेच या पुलातून योग्य प्रकारे पाण्याचा निचरा न झाल्याने या नाल्याचे पाणी रस्त्यावर येऊन रस्ता अदृश्य होतो .रस्ता अदृश्य झाल्याने देखील या ठिकाणी अपघाताची शक्यता नाकारता येत नाही .त्यामुळे ना नाल्याच्या लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी या भागातील नागरिक करीत आहे.
