चैन स्नाचिंग करणारा अज्ञात चोर अखेर वरोरा पोलिसांच्या ताब्यात

प्रतिनिधी:कल्पक ढोरे,वरोरा

फेब्रुवारी महिन्यात शिवाजी वॉर्ड,वरोरा येथील रहिवासी असलेल्या विमलताई दशरथ तोटावार वय 82 वर्ष यांच्या गळ्यातील सोन्याची चैन चोरी गेली होती.त्यांनी वरोरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करताच गुन्ह्याचा तांत्रिक दृष्ट्या तपास केला असता त्यात आरोपी गणेश सुरेश फाले वय 34 वर्ष रा. सुमित्रा नगर तुकुम चंद्रपूर यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली व आरोपीने जबरीने चोरून नेलेली सोन्याची चैन 8 ग्राम कि. 38140 रु , गुन्हा करण्यासाठी वापरलेली मोटारसायकल MH 34 AD 5272 कि. 40,000 रु व आरोपीच्या ताब्यात मिळून आलेला मोबाईल कि. 8,000 रु. असा एकूण 86140 रु चा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाही मा. पोलीस अधीक्षक चंद्रपूर श्री. अरविंद साळवे साहेब, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. प्रशांत खैरे , मा. उप विभागीय पोलीस अधिकारी वरोरा श्री. निलेश पांडे यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक वरोरा श्री दिपक खोब्रागडे यांचे अधिपत्यात स.पो.नि राजकीरण मडावी, पोउपनी सर्वेस बेलसरे, सफो विलास बलकी, पोहवा राजेश वऱ्हाडे, रणधीर मेश्राम, नापोशी किशोर बोढे, दिलीप सूर, पोशी कपिल भांडारवार , दिनेश मेश्राम, विशाल गिमेकर, सुरज मेश्राम, महेश बोलगोडवार , प्रदीप ताडाम या डीबी पथकांनी पार पाडली.