हिंदू युवा संघटनेचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते मुन्ना कुमार पाठक यांचे कडून अनाथआश्रमाला जीवनावश्यक साहित्य भेट

वरोरा येथील सोनुबाई येवले अनाथाश्रम आश्रमात अंध ,अंपग मनोरुग्ण ,समाजानी नाकारलेल्या लोकांना आसरा देण्याचे काम मागील दहा ते बारा वर्षापासुन सोनुबाई येवले करीत आहे .समाजातील अनेक दानशुर व्यक्ती आपआपल्या परिने या अनाथलयाला मदत करीत असतात . वरोरा येथील हिंदू युवा संघटना तथा सामाजिक कार्यकर्ते मुन्ना कुमार पाठक यांनी समाजपयोगी उपक्रम राबवित असतात. यंदाही भाऊबीज च्या पर्वावर सोनुबाई येवले यांच्या अनाथाश्रमात करण्याचा निर्णय मुन्ना पाठक व त्यांचे सहकारी मित्र मंडळी यांनी एक मत केला.हिंदू युवा संघटनेचे सहयोजक तथा वरोरा शहरातील सामाजिक कार्यकर्ते मुन्ना कुमार पाठक , कुणाल पिदुलकर , साहिल वाभिटकर ,विनीत देठे शुभम चोपणे ,धवल पटेल ,अनुप सरोदे श्रीधर पनके ,निहाल धोटे ,आदित्य पाठक ,हेमंत डफ ,तुषार संचेती , रितीक ढोक सचिन पाराशर आकाश पाठक व सहकरी मित्र सोनुताई येवलेनी हिंदू युवा संघटनेचे आभार सोनु ताई येवले यांनी मानले.