नगरपरिषदतर्फे निकृष्ट दर्जाचे काम लपविण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचे नाटक?

मनसेच्या विरोधात चक्क सर्व पक्षीय नगरसेवक आंदोलनात

कामात भ्रष्टाचार नाही तर रस्ता काही महिन्यातच खराब का झाला?

शनिवारी सुट्टीच्या दिवशी कसली पाहणी सुरू होती?

सुट्टीच्या दिवशी शासकीय अभियंता तिथे हजर कसा?

वरोरा शहरातननगरसेवक व नगराध्यक्ष अहेतेशाम अली यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तालुका अध्यक्ष वैभव डहाने यांच्या विरोधात आंदोलन केल्याने एकच खळबळ उडाली असून नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या बाजूने चक्क नगराध्यक्ष का आले? याबद्दल तर्क वितर्क लावले जात आहे.

गिट्टी उघडी पडलेल्या रस्त्यावर प्लास्टर करून काय लपविण्याचा प्रयत्न होत होता?


शहरात निकृष्ट दर्जाचे सिमेंट रस्ते झाल्याने काही महिन्यातच त्यावर पडलेल्या भेगा व सिमेंट उखडल्याने शहरातील जनतेत निर्माण झालेला असंतोष यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष वैभव डहाने यांनी वेळोवेळी नगरपरिषद प्रशासनाला निवेदने दिली होती, या दरम्यान दरम्यान सिमेंट रस्त्यांवर पडलेल्या भेगा व उखडलेले सिमेंट यावर लीपापोती करून भ्रष्टाचार लपविण्यासाठी ऐन सुट्टीच्या दिवशी नगरपरिषद अभियंता पुनवटकर हे रस्त्यांचे बांधकाम कंत्राटदार यांच्या सोबत त्या उखडलेल्या सिमेंट रस्त्यांवर सिमेंट पाणी टाकून तात्पुरती डागडुजी करीत असल्याचे लक्षात येताच त्यांनी उपस्थित अभियंता पुनवटकर यांना या निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत विचारणा केली असता त्यांनी कुठल्याही प्रश्नाचे उत्तर दिले नाही.त्यामुळे संतापलेल्या वैभव डहाने यांनी सरळ सिमेंट पाणीच त्यांच्या तोंडाला फासून नगरपरिषद प्रशासनाकडून होत असलेल्या भ्रष्टाचाराचा निषेध केला. पण सुट्टीच्या दिवशी सुद्धा अभियंता जणू कामावर होते हे दाखवून पोलीस स्टेशन मधे राजकीय दबाव टाकून तक्रार देण्यात आली व मनसे तालुका अध्यक्ष वैभव डहाने व सोबत असलेल्या राहुल खारकर यांच्या विरुद्ध कलम 353 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या संदर्भात न्यायालयात अटकपूर्व जामीन करिता अर्जाची सुनावणी सुरू आहे, मात्र नगरपरिषद सत्ताधारी यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना समोर करून मनसे तालुका अध्यक्ष यांना अटकपूर्व जामीन मिळू नये याकरिता आज आंदोलन करण्यात आले आहे.

रस्ता तयार झाल्याच्या काही महिन्यात च गिट्टी उघडी मग रस्त्याचा दर्जा उत्तम कसा?

जनतेच्या पैशाचा असा दुरुपयोग व त्यातून होणारा भ्रष्टाचार संपविण्यास जर महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुढाकार घेत असेल तर त्यांच्या सोबत किमान विरोधी पक्षाचे नगरसेवक सोबत असायला हवे पण ते चक्क सत्ताधारी यांच्या दावणीला बांधले गेले असल्याने ते सुद्धा या भ्रष्टाचारात सहभागी असल्याचे निष्पन्न होते त्यामुळे या भ्रष्ट कारभाराविरोधात शहरातील जनतेने आवाज उठवायला हवा अशी विदारक परिस्थिती दिसत आहे.