
स्वातंत्र्याच्या 75 वर्षानिमित्त नाशिक येथे आज युवा कार्यक्रम एंव खेल मंत्रालय भारत सरकार अंतर्गत नेहरू युवा केंद्र नाशिक च्या वतीने फिट इंडिया फ्रीडम रन चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे यांच्या हस्ते फ्रिडम रन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. विद्यार्थ्यांना संबोधित करताना नितीन मुंडावरे म्हणाले की नाशिक जिल्हा हा विविध प्रकारच्या गड-किल्ल्यांनी समृद्ध आहे. आणि या गडकिल्ल्यांवर ट्रेकिंग करून स्वतःच्या तंदुरुस्तीसाठी युवकांनी प्रयत्न करावयास हवे. केंद्रशासनाने हे अभियान सुरू केले असले तरी तो एक शासनाचा भाग कमी व वैयक्तिक तंदुरुस्तीचा भाग अधिक असल्याने युवकांनी स्वतः त्यात सहभागी व्हावे असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी सातपूर आयटीआय कॉलेज चे प्राचार्य आर एस मानकर, क्षेत्रीय प्रचार अधिकारी पराग मांदडे, क्रीडा अधिकारी महेश पाटील,
स्वातंत्र्यसैनिक सरस्वतीबाई मोरे, लिलाबाई बिरार, सत्यभामाबाई मोजाड, मनोहर कुलकर्णी, कौशल्या मनियार, सुमनबाई मणियार, मनोरमाबाई रहाणे, हुतात्मा स्मारकाचे प्रमुख उत्तमराव तांबे आदी उपस्थित होते यावेळी नेहरू युवा केंद्र जिल्हा युवा अधिकारी यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना तर नेहरू युवा केंद्र नाशिक कार्यालयाचे कोषाध्यक्ष सुनिल पंजे यांनी आभार प्रदर्शन, महेश शेटे यांनी सुत्रसंचलन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नेहरू युवा केंद्र नाशिकचे युवा राष्ट्रीय स्वयंसेवक योगीराज गायकवाड, प्राजक्ता मंडाले, सुरेश भोर, प्रथमेश जाधव, साहेबराव भोये, किरण चव्हाण आदींनी परिश्रम घेतले.
