
प्रतिनिधी : चेतन एस. चौधरी
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व राष्ट्रगौरव महाराणा प्रतापसिंह यांच्या अश्वारूढ स्मारकांचा पायाभरणी कार्यक्रम गुजरात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा. सी. आर. पाटील साहेब यांच्या हस्ते व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
दोंडाईचा नगरपालिका वतीने धुळे चौफुली येथे छत्रपती शिवाजी महाराज व मालपूर चौफुली येथे राष्ट्रगौरव महाराणा प्रतापसिंह यांचे अश्वारूढ पुतळे स्थापित केले जाणार आहेत. या प्रतिमांचे आगमन व प्रस्तावित स्मारकांचे भूमिपूजन यावेळी झाले.
यावेळी माजी मंत्री श्री जयकुमार रावळ, नगराध्यक्षा सौ. नयनकुंवर रावळ धुळे शहराचे महापौर श्री प्रदीप कर्पे व इतर मान्यवर तसेच शहर व परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.
