वसईकर दाम्पत्यांच्या पाठपुराव्याने 800 लाभार्थ्यांना मिळाला विविध योजनांचा लाभ

प्रतिनिधी: चेतन एस. चौधरी

नंदुरबार- नंदुरबार नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 18 मधील भाजपाच्या नगरसेविका संगिताताई वसईकर व भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संतोष वसईकर यांच्या सततच्या पाठपुराव्याने प्रभागातील 800 हुन अधिक लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवुन दिला आहे. यामुळे वंचित लाभार्थ्यांच्या चेहर्‍यावर समाधानाचे भाव कार्यक्रमातून दिसून आले. या योजनांच्या लाभार्थ्यांना वेळोवेळी वितरण करण्यात आले आहे.

नंदुरबार शहरातील प्रभाग क्रमांक 18 मधील निराधार, कामगार व वयोवृध्द विविध योजनांच्या लाभांपासुन वंचित होते. प्रभागातील नगरसेविका संगिताताई वसईकर व भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संतोष वसईकर यांनी स्वतः घरोघरी जावुन लाभार्थ्यांची माहिती गोळा केली. तसेच संसदरत्न खा.डॉ.हिनाताई गावित, आ.डॉ.विजयकुमारजी गावित, अमळनेरचे माजी आ.शिरीषदादा चौधरी, भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजयभाऊ चौधरी, उद्योगपती प्रा.डॉ.रविंद्रबापु चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली वंचित लाभार्थ्यांचे प्रस्ताव तयार करुन संतोष वसईकर यांनी शासन दरबारी सादर केले. त्यांना मंजुर मिळवुन दिली आहे. त्यात उज्ज्वला गॅस योजनेचे 260, बांधकाम मजूर कामगार 350, खावटी अनुदान योजना 150, अनेकांना नवीन रेशनकार्ड तसेच संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ वृध्दापकाळ योजना, अपंग अनुदान योजना अशा विविध योजनेतील सुमारे 800 हून अधिक लाभार्थ्यांचा समावेश आहे. केंद्रातील मोदी सरकारला 8 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने नंदुरबार शहरातील चव्हाण चौकात लाभार्थ्यांचा भव्य मेळावा घेण्यात आला. यावेळी खा.डॉ.हिनाताई गावित, आ.डॉ.विजयकुमारजी गावित, अमळनेरचे माजी आ.शिरीषदादा चौधरी, भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजयभाऊ चौधरी यांनी केंद्र सरकारच्या योजनांची माहिती दिली. याप्रसंगी जि.प.सदस्या डॉ.सुप्रियाताई गावित, पालिकेतील भाजपाचे गटनेते अ‍ॅड.चारुदत्त कळवणकर, नगरसेविका संगिताताई वसईकर, नगरसेवक गौरव चौधरी, नगरसेवक प्रशांत चौधरी, भाजपाचे जिल्हा संघटन सरचिटणीस निलेश माळी, भाजपाचे शहराध्यक्ष नरेंद्र माळी, महिला शहराध्यक्षा योगिता बडगुजर आदी उपस्थित होते. नगरसेविका संगिता वसईकर व संतोष वसईकर हे दाम्पंत्य महात्मा फुले जीवनदायी योजना असो, रात्री बेरात्री गरीबांसाठी मदत असो, रुग्णालयाचे कोणतेही काम असो, अशावेळी स्वतः पुढाकार घेवुन धावुन जात असतात. आतापर्यंत जीवनदायी योजनेमार्फत अनेक रुग्णांना मोफत शस्त्रक्रियेचा लाभ मिळवून दिला आहे. तसेच कोरोना संकट काळात देखील गोरगरीबांना मदतीचा हात दिला आहे. म्हणुन वसईकर दाम्पंत्य हे गोरगरीबांचे मसिहा व संकटसोबती देखील आहेत, असा गौरवोद्वार खा.डॉ.हिनाताई गावित, आ.डॉ.विजयकुमारजी गावित, अमळनेरचे माजी आ.शिरीषदादा चौधरी, भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजयभाऊ चौधरी यांनी केले असून भाजपाच्या सर्व नगरसेवकांनी चांगले काम केल्याचेही कौतूक भाषणातून मनोगत व्यक्त करतांना केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार भाजपा अनुसूचित जातीचे जिल्हाध्यक्ष संतोष वसईकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी बाला चौधरी, गोकुळ भोई, आबा कुंभार, सुनिल चौधरी, वसंत वसईकर, कांतीलाल वसईकर, मधुकर शेलार, महेंद्र मोरे, शुभम वसईकर, शेखर वसईकर, सनी वसईकर आदींनी परिश्रम घेतले.