
स्पर्धा परीक्षा केंद्राकडून गटशिक्षणाधिकारी दिनेश धवड यांचा सन्मान
जि.प.स्पर्धा परीक्षा केंद्र, काटोलचे आयोजन
तालुका प्रतिनिधी/३० सप्टेंबर
काटोल : पंचायत समिती काटोलचे गटशिक्षणाधिकारी दिनेश महादेवराव धवड आज वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले त्यांचा सत्कार सोहळा कार्यक्रम जि.प.स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व अभ्यास केंद्र, काटोल च्या वतीने घेण्यात आले.
कार्यक्रमाचे अतिथी म्हणून केंद्र समन्वयक एकनाथ खजुरीया , केंद्रप्रमुख योगेश चरडे , केंद्र समन्वयक राजेंद्र टेकाडे प्रामुख्याने उपस्थित होते.
दिनेश धवड यांची गटशिक्षणाधिकारी म्हणून कारकीर्द प्रेरणादायी राहिली.त्यांच्या काळात शिक्षक व विद्यार्थी यांच्या समस्या मोठ्या प्रमाणात सोडविल्या गेल्या.त्यांच्या स्वप्नातील प्रकल्प म्हणजे जि.प.स्पर्धा परीक्षा केंद्र हा कार्यान्वित झाला.काटोल तालुक्यातील विद्यार्थ्यांना व शाळांना जास्तीत जास्त निधी मिळून देण्यासाठी प्रयत्न केले.
कार्यक्रमासाठी सतीश बागडे, अनुसया रेवतकर, स्वर्णा कोटजावळे, पूजा मारोटकर, प्रवीणा काळे,यामिनी कुंभरे, तेजस्विनी बारस्कर, गौरव उमप, रॉबिन खुरपुडे, मनिष लाड, प्रतीक मानेराव , अजित निंबुळकर आदींनी सहकार्य केले.
