पुसद तालुक्यातील फेट्रा येथे राहणाऱ्या मायलेकाचा चारचाकी वाहनाच्या धडकेने मृत्यू

राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर (9529256225)

ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या पुसद ते खंडाळा रोड वर दुचाकीवर जात असलेल्या मायलेकाचा टर्निंग पॉइंटवर अपघात झाला. अपघातात दोन्ही मायलेकांचा अज्ञात पांढ-या रंगाच्या चार चाकी वाहनाने जबर धडक दिल्याने जागीच मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच खंडाळा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा व ग्रामीण पोलीस स्टेशनचे कर्मचाऱ्यांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. त्यानंतर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत घटना घडल्याने पोलीस प्रशासना कडून पंचनामा करण्यात आला आहे.
सौ.लता सुभाष मुकाडे वय 29 वर्षे व शिवम सुभाष मुकाडे वय 2 वर्षे रा.फेट्रा असे मृत्यू झालेल्या मायलेकाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार लता मुकाडे व त्यांचे सासरा नामदेव मुकाडे वय 50 वर्षे रा.फेट्रा हे फेट्रा येथून पुसद येथे खाजगी कामाकरिता त्यांच्या दुचाकी क्रमांक एम.एच. 29,बी.क्यु.9240 आले होते. व काम आटोपल्यानंतर दि.१ आक्टोंबर चे दुपारी दोन ते अडीच वाजताच्या दरम्यान परत गावाकडे फेट्रा येथे परत जात अस्तांना खंडाळा घाटातील टर्निंग पॉईंटवर सासरे नामदेव यांचे वाहनाला खंडाळा वरुन पूसद कडे येत असलेल्या फोर व्हिलर वाहनाची धडक लागली. संतुलन बिघडल्याने दोन्ही मायलेक खाली पडले. व दोघाचा जागीच मूत्यू झाला. खंडाळा वरून पुसद मार्गे येत असलेल्या पांढ-या रंगाच्या अज्ञात चार चाकी वाहनाने दोघांनाही धडक देवून चार चाकी वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवीत पसार झाले. घटना घडून अर्धा ते पाऊण तास वेळ झाला व जबर गर्दी झाल्या ने खंडाळा पोलीस स्टेशन ला कार्यरत पोलीस कर्मचारी सचिन मलाये आपली ड्युटी आटोपुन घरी जात असतांना झालेल्या अपघात पाहून लगेच ग्रामीण पोलीस स्टेशनला व शहर पोलीस स्टेशन चे डि.पथक प्रमुख दिपक ताठे यांना फोनवर माहिती दिली त्यांनी सर्व जमलेले गर्दी व वाहतुक सुरळीत केली. तर काही वेळात पोलीस प्रशासन घटनास्थळी हजर झाले. व अपघातात मृत्यू झालेल्या मायलेकाचा घटनास्थळी पंचनामा करुन दोन्ही मृतदेह पुसद येथील उपजिल्हा रुग्णालयांमध्ये शवविच्छेदना करिता दाखल करण्यात आले. होते वृत्त लिहिस्तोवर गुन्हे दाखल झाले नव्हते. यात विशेष बाब म्हणजे दुचाकीला उसाची पेंढी बांधुन घराकडे जात होते.अपघात सुनेचा व नातवाचा मृतदेह पाहून सासर्‍यांनी एकच टाहो फोडत रडत होता व घरातील सर्व मंडळी घटना स्थळी हजर झाले.