
अनिल प्रकाश खामनकार,ग्रामपंचायत सदस्य . सौ. प्रिती जयंता ताजणे ग्रामपंचायत सदस्या सुकनेगांव
उपरोक्त विषयाचे अनुषंगाने निवेदन वजा नोटीस देण्यात येते की, मौजा सुकनेगांव येथे गांवातील नागरीकांना शुध्द पाण्याचा पुरवठा करता यावा या उद्देशाने शुध्द पिण्याच्या पाण्याचे यंत्र मागील दोन वर्षापूर्वी बसविण्यात आले. या करिता 14 वित्त आयोगाचा पैसा खर्ची घालण्यात आला.
परंतु आज सुध्दा शुध्द पिण्याच्या पाण्याचे यंत्र सुरू न झाल्याने, खर्ची झालेला निधी व्यर्थ झाल्याचे दिसून येते किंवा याकडे ग्रामपंचायत बुध्दीपरस्पर दुर्लक्ष करित असल्याचे दिसुन येते. वसविलेल्या शुध्द पिण्याच्या पाण्याचे यंत्र सुरू न केल्यामुळे आज गांवात विषाणुजण्य रोग ताप, डेंगु, मलेरिया, टायफाईड, हगवण, उलटी सारखे आजार उत्कृष्ट दर्जाचे पाणी न मिळाल्याने रोग प्रतिकारक क्षमता खालावली असल्याने वरील आजाराने सामोरे जात आहे. यास जबाबदार कोण?
तेव्हा आम्ही आपणांस विनंती करतो की, ही नोटीस मिळताच 15 पंधरा दिवसांच्या आत शुध्द पिण्याच्या पाण्याचे यंत्र सुरू करावे अन्यथा गावात दुषित पाण्यापासून निर्माण होणाऱ्या आजाराचा संपूर्ण खर्च 15 वित्त आयोगात तरतुद करण्यात आलेल्या आरोग्य निधी अंतर्गत करण्याचा हमी आम्हाला मिळावी.
अन्यथा आपणा विरूध्द मु. ग्रा. अ. 1958 चे कलम 38 व 39 अन्वये दोषास पात्र समजण्यात येईल व पुढील कारवाईस आपण सर्वस्वी जबाबदार राहाल.ग्रा पं सरपंच यांना सादर
