T1 अवनी वाइल्डलाईफ प्रोटेकशन क्लब राळेगाव यांनी दिले अजगराला जीवदान.

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामु भोयर (9529256225)

राळेगाव तालुक्या मध्ये प्राणी मित्र .T1 अवनी वाइल्डलाईफ प्रोटेकशन क्लब. या नावाने संस्था काही काळापासून कार्यरत आहेत.आता होत असलेल्या रोजचा पावसा मुळे नदी नाल्यांना पूर येत आहे. आणि त्या मध्ये बऱ्याच प्रमाणात साप पाण्यात वाहून येत असल्या मुळे साप खूप प्रमाणात दिसून येत आहे. अमित वानखडे राहणार इचोरा यांचा शेतामध्ये साप दिसल्याची त्यांनी माहिती T1 अवनी वाइल्डलाईफ प्रोटेकशन क्लब राळेगाव ग्रुप चा जेष्ठ सर्पमित्र विजयभाऊ सूर्यवंशी , उपाध्यक्ष आशिष येरकाडे , सचिव नयन कोकाटे यांना दिली.क्षणाचाही विलंब न करता राळेगाव येथील T1 अवनी वाइल्ड लाईफ प्रोटेकशन क्लब राळेगाव. मधील सदस्य तुषार दारूनकर , अनिल शिंदे , हर्ष येडे यांनी तिथे जाऊन पाहणी केली असता. तिथे त्यांना अजगर या जातीचा साप शेतामध्ये दिसून आला. सापाची लांबी अंदाजे 7 ते 8 फूट असून 12 ते 15 किलो त्याचे वजन आहे त्याला अतिशय चपळाईने आपल्या ताब्यात घेतले व तेथील उपस्थित व्यक्तींना त्या सापाची माहिती दिली.T1 अवणी वाइल्डलाईफ प्रोटेकशन क्लब राळेगाव चा वतीने शेतकऱ्यांना सूचना आहे की त्यांनी शेतामध्ये जरा जपून काम करावे हिवाळा सुरु होत असल्या मुळे सगळ्यात जास्त या ऋतू मध्ये सापाचे चावा घेण्याचे प्रमाण आहे .तरी सर्व शेतकऱ्यांनी शेतात जाताना गवताळ भागात पाय ठेवताना थोडी शहानिशा करून घ्यावी व होईल तेवढे पायात बूट घालावा.
माहिती : – अजगर या सापाची अधिकतम लांबी . 760 से.मी. (24 फीट 11 इंच ) इतकी असते. रंग व आकार: – राखाडी किंवा फिकट तपकिरी गडद तपकिरी धाब्बे पोटाकडचा भाग पांढरा किंवा फिकट पिवळसर शरीर स्थूल खवले मऊ डोक्यावर कोणासारखी आकृती डोळ्यातल्या बाहुल्या उभ्या. शेपटी आखूड
प्रजनन :- पाळापाचोळ्याचा ढीग करून मादी त्यात 20 ते 80 अंडी घालते. 90 ते 100 दिवसात पिल्ले अंड्यातून बाहेर येतात.
वैशिष्टये:- निशाचर. जबड्याच्या पुढील टोकावर असलेल्या उष्णसवेदनाग्राहक खाचामुळे त्यांना भक्ष्य शोधण्यास मदत होते . भक्ष्याला तोंडाने पकडल्यावर शरीराला विळखा घालतो व आवळून गुदमरून मारतो मग भक्षाचा तोंडाकरून सुरुवात करून गिळतो मध्यम आकाराचा प्राणी पचवायला त्याला अंदाजे तीन आठवडे लागतात वन्यजीव स्वरंक्षण कायदा 1972 अंतर्गत वन्यजीवांच्या वर्गवारी शेड्युल (1) मध्ये येतो.