
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
पांढरकवडा वन विभागा मध्ये मारेगाव वनपरिक्षेत्रा मधील वडकी सर्कल मधील सावरखेड गावा मध्ये वनजीव्य सप्ताह साजरा करण्यात आला,यावेळी वन संवर्धन ,संरक्षण ,या गोष्टीच मार्गदर्शन करण्यात आले ,यावेळी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते ,अनन्या व लावण्या संदीप ड गवार,आशिष सुरपाम,अमोल मुंडाले यांचा अनुक्रमे प्रथम ,द्वितीय,तृतीय क्रमांक आला त्यांना भेट वस्तू देण्यात आल्या ,या कार्यक्रमाला श्री.वासनिक (मारेगाव वनपरिक्षेत्र) श्री .अक्केवार (वडकी वन क्षेत्र),वनरक्षक सिडाम,भसाळकर, मुख्याध्यापक श्री .बोरपे, शिक्षक श्री. केराम व डगवार उपस्थित होते.
