
श्री. विश्वप्रभव आयुर्वेदिक चिकित्सालय व पंचकर्म केंद्राच्या माध्यमातुन डॉ. भाग्यश्री जीभकाटे ह्यांनी केले उपचारकोजागिरी पौर्णिमा मुहूर्तावर दमा, सर्दी, अस्थमा आजारावर भव्य आयुर्वेदिक उपचार शिबीर संपन्न झाले. हे आयोजन डॉ. भाग्यश्री रतन जिभकाटे यांच्याकडून श्री. विश्वप्रभव आयुर्वेदिक चिकित्सालय व पंचकर्म केंद्र गडचांदूर येथे 19 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आले होते. या आयुर्वेदिक औषधोपचार शिबीराचा शेकडो रूग्णांनी लाभ घेतला.
शिबिरामध्ये दमा, जुनाट सर्दी, कफाचे आजार, एलर्जीक सर्दी या आजारावर औषधोपचार, मार्गदर्शन व पंचकर्म सल्ला देण्यात आला. तसेच शिबिरात उपस्थितांना नियमीत आहार, योगा, जीवनमान यावर डॉ. भाग्यश्री जिभकाटे यांनी मार्गदर्शन केले.
आयुर्वेदिक औषधोपचार हा फार पुर्वीपासून चालत आलेला असून या औषधोपचारमध्ये मोठमोठे आजार सुधारणा करण्याचे बळ आहे. शरीरातील जुन्या व्याधीवर आयुर्वेदिक पंचकर्मातून उपचार करून आराम मिळू शकते यामुळे रुग्णांनी आयुर्वेदिक औषधोपचार अधिक वापर करण्याचे आवाहन डॉ. भाग्यश्री जिभकाटे यांनी यावेळी केले. या शिबीराचा गडचांदूर, राजुरा, कोरपना व शेजारील गावातील शेकडो रूग्णांनी लाभ घेतला.
