
प्रतिनिधी:उमेश पारखी,राजुरा
राजुरा: शहरात नाका नंबर 3 परिसरात आज दिवसाढवळ्या दोन अज्ञात मारेकऱ्यांनी राजू यादव नामक इसमाची हत्या केली,राजू यादव हा सास्ती कॉलनी येथील रहिवासी असून तो केस कापण्यासाठी एका केस कर्तनालायत आला होता, प्रस्तुत घटनेमुळे शहरात काही काळ तणावाचे वातावरण तयार झाले होते,अज्ञात मारेकऱ्यांचा पोलीस प्रशासन कसून शोध घेत असून बातमी लिहिपर्यंत मारेकऱ्यांचा शोध लागला नाही.
राजुरा शहरालगत मोठ्या प्रमाणात बाहेरून आलेल्या रहिवाशांची संख्या वाढलेली असून शहराच्या इतिहासात गोळीबार झाल्याची ही कदाचित पहिली वेळ असावी,राजुरा शहर भविष्यात गुन्हेगारांचा अड्डा तर होणार नाही अशी सुप्त भीती नागरिकांत व्यक्त केली जात आहे.
