
प्रतिनिधी:उमेश पारखी,राजुरा
OHIO State University Of USA या विद्यापीठाने रसायनशास्त्रातील शोध प्रबंधाबद्दल डॉक्टरेट ही पदवी बहाल
राजुरा: परिस्थिती प्रतिकूल असली तरी त्या परिस्थितीवर मात करता येते याचे जिवंत उदाहरण म्हणजे डॉ.महेश मिनानाथ परसुटकर!
राजुरा तालुक्यातील एका छोट्याशा गावातून शैक्षणिक क्षेत्रात उंच भरारी घेणाऱ्या या युवकाला OHIO State University Of USA या विद्यापीठाने रसायनशास्त्रातील शोध प्रबंधाबद्दल डॉक्टरेट ही पदवी बहाल केली,त्याने आपल्या दैदिप्यमान कामगिरीने संपूर्ण राजुरा तालुक्याचे नव्हे तर चंद्रपूर जिल्ह्याचे नाव वैश्विक पटलावर नेले आहे.
राजुरा तालुक्यात एक छोटेसे गाव आहे बोडखा(बोडगाव) या गावातील पारंपरिक शेती करणारे शेतकरी श्री.मिनानाथ परसुटकर यांचा महेश हा मुलगा, महेश अगदी लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होता,त्याने आपले दहावीपर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळा,राजुरा येथे,बारावी मास्टर दीनानाथ ज्युनियर कॉलेज नागपूर येथे पूर्ण केले, बी.एस.सी.पदवीचे शिक्षण प्रेसिडेंट युनिव्हर्सिटी कोलकत्ता येथे तर आय.आय.टी. कानपुर येथून एम.एस.सी.पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले,तर अमेरिकेतील एम आय टी कॅम्ब्रिज विद्यापीठ येथून पी.एच. डी. पूर्ण केली, त्याच्या अशा थक्क करणाऱ्या शिक्षणप्रवासाने त्याने आपल्या गावाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर नेले,आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणारा महेश हा खऱ्या अर्थाने युवकांचा आदर्श आहे,परिस्थिती कशीही असली तरी प्रबळ इच्छाशक्तीने कठीणातले कठीण ध्येय साध्य करता येते हे डॉ.महेशनी दाखवून दिले.त्याचे कार्य आपल्या कुटुंबा आणि गावासाठी अभिमानास्पद ठरले आहे,प्रत्येक स्तरातून डॉ.महेश यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
डॉ.महेश आणि त्यांच्या कुटुंबाला लोकहीत महाराष्ट्रातर्फे पुढील आयुष्यासाठी भरभरून शुभेच्छा.
