लोकवर्गणीतून व श्रमदानातून पांदण रस्त्याची दुरुस्ती..!

प्रतिनिधी:उमेश पारखी,राजुरा

हिरापुर – राजुरा व कोरपना तालुक्याच्या सिमेवर असलेले हिरापुर या गावामध्ये गेले अनेक वर्षापासून पांदण रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी करून सुद्धा कोणताही शासकीय निधि उपलब्ध न झाल्यामुळे अखेर गावातील नागरिकांनी लोकवर्गणी व श्रमदानातून पांदण रस्त्याची समस्या दूर केली ।
हिरापुर या गावाला काही वर्षापूर्वीच डब्लू.सी.एल ने दत्तक घेतले असून सुद्धा हे केवळ कागदोपत्रीच दिसून येते तसेच कोणत्याही आमदार किंवा खासदार महोदयांनी गावकऱ्यांनी ही मागणी शासन दरबारी रेटून धरली नाही,कोणतीही मदत अजूनही गावाला मिळालेली नाही.
श्रमदानातून पांदण रस्ता दुरुस्ती साठी गावचे माजी पो.पा. श्री. दादाजी पा. गोरे, श्री. मनोज गोरे (अध्यक्ष , शा.व्य.स),श्री सुधाकर पा गोरे, श्री श्रीहरी गोरे,श्री मधुकर गोरे, श्री. वसंता बोबडे,श्री. पंढरी लोहे, श्री संजय गोरे, श्री दिलीप गोरे, श्री. बळीराम गोरे, श्री पुंडलिक गोरे,श्री प्रभाकर गोरे, श्री ज्ञानेश्वर गोरे,श्री सूरज गोहोकर, प्रविण गोरे, स्मितिल गोरे, स्वप्निल गोरे, आकाश लोहे,रक्षक लोहे, अनिकेत पारखी,हर्षल गोरे,उत्पल गोरे आदी लोकांनी पुढाकार घेतला.