भारतीय संविधान दिनानिमित्त वरुर रोड येथील वाचनालयात विद्यार्थ्यासाठी घेतली विविध स्पर्धा

राजुरा: तालुक्यातील जगतगुरु तुकोबाराय सार्वजनिक वाचनालय वरुर रोड येथे २६ नोव्हेंबर भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, रॅली, गितगायन व वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. दरवर्षी प्रमाणे यावर्षीही वरुर रोड या गावात भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आले. सायंकाळी ६ वाजता भव्य रॅली काढण्यात आली त्यानंतर संविधान दिन बुध्द विहार वरुर रोड येथे साजरा करण्यात आला. सर्वप्रथम गावातील प्रतिष्ठित नागरिकांच्या हस्ते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर विशाल शेंडे यांनी भारतीय संविधान उद्देशिकेचे वाचन केले. त्यानंतर वकृत्व स्पर्धा व गितगायन स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्पूर्त प्रतिसाद लाभला. या झालेल्या चारही स्पर्धेत समीक्षा मोडक, श्रुती बोरकर, समीक्षा जीवतोडे, आरोही कमलवार, स्नेहा वांढरे,रुपाली चोथले, सानिका लांडे, सांगिनी आस्वले, रुपाली आस्वले, सपना शिंदे, सोनी निरांजने, कुणाल भोयर, पूर्वी आवघान, समृद्धी उमरे, दीप्ती भैसारे, आर्यन अमरे, काव्या कमलवार, शरवली कोतपल्लीवार,फ्रांसी निरांजने,
प्रेरणा करमनकर, रुनमायी मोंडे, गंदेस्वर, आदि विद्यार्थी/विद्यार्थांनी उपस्थित होते. यावेळी विशाल शेंडे व वनिता लाटेलवार यांनी उपस्थित शालेय विद्यार्थी आणि गावकऱ्यांना संविधान बद्दल मार्गदर्शन केले. स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना जगतगुरु तुकोबाराय सार्वजनिक वाचनालय वरुर तर्फे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.आणि विद्यार्थ्याना विविध बक्षीस देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अश्विनी तेलंग, प्रवीण चौधरी, पल्लवी काळे अनेक विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेघा करमनकर हिने केले तर आभार विशाल शेंडे यांनी मानले.