
प्रतिनिधी:उमेश पारखी,राजुरा
राजुरा: राजुरा सारख्या ग्रामीण भागातील नवनवीन लेखक,कवींना साहित्याच्या क्षेत्रात प्रकाशझोतात आणणारा मंच म्हणजे सप्तरंग प्रकाशन!पुणे,मुंबई सारख्या भागात पारंपारिक साहित्यिक आणि त्यांचे साहित्य यांचा दबदबा आहे,त्याठिकाणी आपल्या विदर्भातल्या नवसाहित्यिकांना संधीच उपलब्ध होत नाही अशात लिहिणाऱ्या नवलेखकांची प्रतिभा आणि त्यांच्या साहित्याला जनमानसात जागा मिळावी या हेतूने राजुरा येथे कवी,लेखक श्री.मनोज बोबडे यांनी सप्तरंग प्रकाशनाची स्थापना केली.सप्तरंग प्रकाशन लेखक श्री.नितीन जुलमे यांची “कलाटणी” ही पहिली कादंबरी आणि प्रख्यात कवी,लेखक डॉ.किशोर कवठे यांनी दैनिक सकाळमध्ये लिहिलेल्या “दिशा अंधारल्या जरी” लेखसंग्रहाचे प्रकाशन करीत आहे.डॉ.किशोर कवठे यांचे हे चवथे पुस्तक आहे.
श्री.नितीन जुलमे हे पेशाने शिक्षक असून आपल्या नोकरीच्या निमित्ताने त्यांनी महाराष्ट्राच्या कोकण विभागात शिक्षणदानाचे कार्य करीत असताना कोकणचा त्यांनी जवळून अभ्यास केला आहे,जुलमे हे मूळचे राजुरा तालुक्यातील कोच्ची या छोट्याशा खेड्यातील असून ते कवी सुद्धा आहेत.त्यांची “कलाटणी” ही पहिलीच तर सप्तरंग प्रकाशनाचीही ही पहिलीच कादंबरी आहे.त्यांची कादंबरी जरी आधी प्रकाशित होत असली तरी त्यांनी काव्यक्षेत्रातही आपली छाप उमटवली आहे.महत्वाचं म्हणजे राजुरा तालुक्यातील लेखकाची या क्षेत्रातील पहिलीच कादंबरी आहे.
सुपरिचित कवी, लेखक डॉ. किशोर कवठे यांचे ‘दिशा अंधारल्या जरी’ हे आपण जगत असलेला भवताल त्यातील सर्वसामान्यांचे संघर्षमय जगणे लालित्यपूर्ण शब्द साजाने सजवून वाचकांच्या मनाचा आधीच सकाळ या वृत्तपत्राच्या माध्यमाने ठाव घेतला आहे. आता त्याच लेखांचे संकलन या पुस्तकरूपाने सुहृदय रसिक वाचकांसाठी सप्तरंग उपलब्ध करून देत आहे. डॉ.किशोर कवठे सामान्य कुटुंबातील असामान्य व्यक्तिमत्व असून ते पेशाने शिक्षक आहेत आणि यांना महाराष्ट्रातील सामान्य माणूस आज “दगानकार” म्हणून ओळखू लागला आहे,त्यांचा “दगान” हा काव्यसंग्रह कित्येक पुरस्कारांनी गौरविण्यात आलेला आहे तर या अगोदर डॉ.किशोर यांची चार पुस्तके प्रसिद्ध झाली असून हे त्यांचे पाचवे पुस्तक सप्तरंग प्रकाशन घेऊन येत आहे.
सप्तरंग प्रकाशनाने राजुरा सारख्या दुर्गम भागात साहित्याची मशाल तेवत ठेवली आहे,आजपर्यंत राजुरा विभागात नवीन साहित्यिकांत साहित्याविषयी चेतना जागृत करण्याचे आणि त्यांना हक्काचा मंच निर्माण करून देण्याचे काम सप्तरंग करीत आहे.सप्तरंग प्रकाशनाने आजपर्यंत दहा पुस्तके प्रकाशित केली असून हे प्रकाशनचे अकरावे पुस्तक आहे.साहित्य प्रसाराचे कार्य अविरतपणे सुरू ठेवलेल्या प्रकाशन मनोज बोबडे यांनी वरील दोन्ही पुस्तकांना वाचकांनी भरभरून प्रतिसाद द्यावा असे आवाहन वाचकांना केले आहे.
