
प्रतिनिधी:वैभव महा,राजुरा
राजुरा : चंद्रपूर जिल्यातील राजुरा तालुक्यातील तेलंगणा सीमेच्या जवळ असलेल विरूर स्टेशन हे गाव, या गावाभोवती अनेक गावाचा संपर्क असून येथील गावालगत अनेक गावाचा समावेश आहे, विरूर येथे रेल्वे स्टेशन अस्तित्वात असून, कोरोना महामारीमुळे या रुळावरून धावणाऱ्या सर्व पॅसेंजर गाड्या रद्द करण्यात आल्या आहे, कारण या रुळावरून जाणाऱ्या गाड्या या स्टेशनवर थांबत नसल्यामुळे विरूर तसेच परिसरातील नागरिकांना यांचा त्रास सहन करावा लागत आहे, या मार्गावर जाणाऱ्या रेल्वे रामगिरी पॅसेंजर , भाग्यनगर पॅसेंजर , तसेच अजनी पॅसेंजर या गाड्या या मार्गावर धावत असून काही महिन्यापासून या सर्व पॅसेंजर गाड्या बंद करण्यात आल्या आहे, या सर्व गाड्या परत लवकर सुरु कराव्या अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली आहे.
या सर्व अडचणीची बाब येथील नागरिकांनी माजी आमदार अँड. संजय धोटे यांच्याकडे याचना केली, हि बाब लक्षात येतात, या संदर्भात माजी आमदार अँड. संजय धोटे यांनी केंद्रीय रेल्वे व कोळसा राज्यमंत्री ना. रावसाहेब पाटील दानवे यांच्याकडे पत्राद्वारे माहिती दिली, कि विरूर स्टेशन वर पॅसेंजर गाड्या सुरु झाल्याने नागरिकांना येथील उद्योग वर्गाना तसेच व्यापारी बांधवाना यांचा फायदा होईलच तसेच पॅसेंजर गाड्या सुरु झाल्याने याचा नागरिकांना कमी पैश्यात प्रवास करता येईल, माजी आमदार अँड. संजय धोटे यांनी केंद्रीय रेल्वे व कोळसा राज्यमंत्री ना. रावसाहेब पाटील दानवे यांच्याकडे पॅसेंजर रेल्वे गाड्याची माहिती देताना सांगितले, कि
भाग्यनगर पॅसेंजर गाडी नंबर १७२३३ ही गाडी सिंकदराबाद ते बल्लारपूर,
गाडी नंबर १७२३४ ही गाडी बल्लारपूर ते सिंकदराबाद,
रामगिरी पॅसेंजर गाडी नंबर ५७१२१ ही गाडी काजीपेठ ते बल्लारपूर,
गाडी नंबर ५७१२४ ही गाडी बल्लारपूर ते काजीपेठ,
अजनी पॅसेंजर गाडी नंबर ५७१३५ ही गाडी काजीपेठ ते अजनी,
गाडी नंबर ५७१३६ ही गाडी अजनी ते काजीपेठ,
इंटरसिटी एक्सप्रेस गाडी नंबर ०२७७१ ही गाडी सिंकदराबाद ते रायपूर,
गाडी नंबर ०२७७२ ही गाडी रायपूर ते सिंकदराबाद,
ह्या सर्व गाड्या रोज विरूर या रुळावरून धावत असता, या सर्व गाड्या विरूर स्टेशनला थांबल्या तर येथील नागरिकांना सोयीस्कर होईल, या सर्व गाड्याचा नागरिकांना फायदा होईल असे त्यांनी सांगितले, जनतेची मागणी लक्षात घेता या सर्व पॅसेंजर रेल्वे गाड्या व इंटरसिटी एक्सप्रेस थांबा देण्याकरिता केंद्रीय रेल्वे व कोळसा राज्यमंत्री ना. रावसाहेब पाटील दानवे यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली माजी आमदार अँड. संजय धोटे यांनी विनंती केली आहे.
