तरुण शेतमजुराची गळफास घेऊन आत्महत्या

राजुरा – हिरापूर गावात १५/७/२०२१ ला रात्री २ वाजता सुमारास विलास रामदास शेरकुरे वय ३२ वर्ष या शेतमजुरानी गळफास घेऊन आत्महत्या केली. घरातील आर्थिक परिस्थिती हलाखीची होती. शेतीमजुरीची कामे करून आपल्या कुंटुबाची उदरनिर्वाह करायचा. कुंटुबाची संपूर्ण जबाबदारी असल्याने घरात लागणार जीवनावश्यक वस्तू , आरोग्य, आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागत होते. एकंदरीत कोरोना ने सर्वसामान्य नागरिकांचा जगण देखील मुश्किल केलं आहे .सर्व सामान्य नागरीकरणाच्या हाताला काम नसल्याने अश्या घटना घडत आहे .मृतकाच्या मागे पत्नी, मुलगी आणि मुलगा असा छोटं कुंटुब आहे. हातावर आणायचे आणि पानावर खायचे असं कुंटूंबाचं उदरनिर्वाह करायचे, कुंटुंबाचा कर्ता पुरुष गेल्याने कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले.