राज्यसीमेवरील लक्कडकोट येथे चक्काजाम आंदोलन,गोरेवाडा प्राणी संग्रहालयाला गोंडवाना नाव देण्याची मागणी

प्रतिनिधी:उमेश पारखी,राजुरा

.

राजुरा :- विदर्भातील नागपूर जिल्हात असलेल्या गोरेवाडा येथील प्राणी संग्राहालयाला राज्य शासनाने स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे नाव दिल्यामुळे संतप्त गोंडवाना गणतंत्र पार्टी जिल्हा चंद्रपूर च्या वतीने राज्यसीमेवरील लक्कडकोट येथे चक्काजाम आंदोलन करून तीव्र विरोध दर्शवन्यात आला असून गोंडवाना प्राणी संग्राहालय करण्याची मागणी दि. 26 जानेवारीला चक्काजाम करून करण्यात आला प्राणी संग्राहालय हे मध्य भारतातील गोंडवाना भूमी असलेल्या विदर्भातील नागपूर जिल्हात आहे. स्वातंत्र्य पूर्व काळात या क्षेत्रात गोंड राज्यांचे साम्राज्य होते. नागपूर या एतिहासिक शहराची स्थापना 300 वर्षापूर्वी गोंडराजे बक्त बुलंदशहा यांनी केले होते. या भागात आजही मोठ्या प्रमाणात अनुसूचित जमाती समूहाची लोकसंख्या असून या भूमीला गोंडवाना लँड या नावाने ओळखले जाते. गोरेवाडा प्राणी संग्राहालयास गोंडवाना हे नाव देण्याची मागणी विदर्भातील लोकांनी फार पूर्वी पासून केलेली आहे व आजही करत आहे. मात्र या मागणीला डावलून स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात आल्याने आदिवासी समाजात असंतोष पसरला आहे. त्या अनुषंगाने गोंडवाना गणतंत्र पार्टी जिल्हा चंद्रपूर च्या वतीने लक्कडकोट राज्यसिमेवर चक्काजाम आंदोलन मा. अब्दुल जमीर अब्दुल हमीद जिल्हाउपाध्यक्ष गोंडवाना गणतंत्र पार्टी जिल्हा चंद्रपूर यांच्या नेतृत्वात करण्यात आले.
राजे संजय आत्राम, किसन मोकाशी, राजे केशवराव आत्राम, गुलाब आरके, वसंत आत्राम, जैतू कुळसंगे माजी सरपंच, संतोष आत्राम, सुभाष मडावी, राजेश मेश्राम, विष्णू घुले व मोठ्या संख्येत चक्काजाम आंदोलनात आदिवासी लोकांनी केली आहे.