महात्मा फुले पुण्यतिथी निमित्त वरुर रोड येथे कार्यक्रमाचे आयोजन

राजुरा:. महात्मा फुले चौक वरुर रोड येथे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शाळेचा संपूर्ण परिसर जगतगुरु तुकोबाराय सार्वजनिक वाचनालय वरुर येथील विद्यार्थ्यांनी स्वच्छ केला.त्यानंतर सायंकाळी ठीक ७.०० वाजता पुण्यतिथीचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. सर्वप्रथम महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर गावातील विद्यार्थीनी भाषने दिले. यामध्ये समीक्षा मोडक, रानु लाटेलवार, श्रुती बोरकर,आर्यन उमरे,आरोही कमलवार,समृध्दी उमरे, दीप्ती भैसारे,काव्या कमलवार, फ्रांसी निरांजने, प्रेरणा करमणकर, वेदांती भोंगळे, जानवी धानोरकर आदि उपस्थित होते.सदर कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले विकास कोतपल्लीवार प्रमुख पाहुणे गुलाब दरेकर, अँड अमोल रामटेके, वनिता ताई लाटेलवार, मोरेश्वर धानोरकर, लयजाबाई रामटेके, सुरेश करमणकर, गणपत जी पंधरे, गणेश करमणकर, मधुकर निरांजने उपस्थित होते. कार्यक्रमाला गावकऱ्यांचा उत्स्पुर्त प्रतिसाद लाभला शेवट महात्मा फुले यांना मानवंदना देण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल शेंडे यांनी केले तर आभार मेघा करमणकर हिने मानले
.