
प्रतिनिधी:उमेश पारखी,राजुरा
राजुरा शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा
रोहीत पवार विचार मंच राजुरा तर्फे मा. मुख्याधिकारी नगर परिषद राजुरा याना निवेदन द्वारे मागणी
राजुरा शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी या निवेदन द्वारे करण्यात आली . शहरात मोकाट कुत्र्यांनी थैमान घातले असून परिसरातील पाळीव प्राणी, कोंबडे यांचे नुकसान होत आहे तसेच छोटे मुल बाहेर खेळत असतात त्यांना सुद्धा या मोकाट कुत्र्या पासून धोका आहे . रस्त्याने जाणाऱ्या वाहनावर कुत्रे धावून जातात त्या मुळे अनेक अपघात होत असते त्यांना त्वरित बंदोबस्त करण्यात यावा असे निवेदन रोहीत पवार विचार मंच राजुरा तालुका अध्यक्ष सुजित कावळे त्यांचा नेतृत्वात देन्यात आले यावेळी केतन जुनघरे , अभिषेक बजुज्वर, उत्पल गोरे,निलेश बोंसुळे, सुरज गव्हाणे,यश मोरे,प्रज्वल ढवस उपस्थित होते
