
राजुरा: पुरोगामी साहित्य संसद व पुरोगामी पत्रकार संघ यांच्या वतीने भारतीय संविधान दिनानिमित्य “देशाची शान -भारतीय संविधान ” या विषयावर काव्य स्पर्धा दिनांक २४ नोव्हेंबर २०२१ ला आयोजित केली होती.श्री शिवाजी महाविद्यालय राजुरा येथून मराठी विभागाच्या वतीने सुरज पचारे, प्रतीक्षा वासनिक, संतोषी सरकार यांना स्पर्धेसाठी पाठविण्यात आले. ह्या स्पर्धेत श्री शिवाजी महाविद्यालय राजुरा येथील सुरज पचारे ह्या विध्यार्थी प्रथम पुरस्काराचा मानकरी ठरला तर प्रतीक्षा वासनिक या विद्यार्थिनीला प्रोत्साहनपर बक्षीस देऊन गौरविण्यात आले. या झालेल्या स्पर्धेत ४० महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. सुरज पचारे यांना तीन हजार रुपये रोख ,सन्मानचिन्ह व प्रमानपत्र देऊन त्याचा सत्कार करण्यात आला.सूरज च्या या यशाबद्दल श्री शिवाजी महाविद्यालय राजुरा चे प्राचार्य डॉ. एस.एम.वरकड सर,उपप्राचार्य डॉ.खेराणी सर तसेच मराठी विभाग प्रमुख डॉ.संतोष देठे सर, आई-वडील, मित्रपरिवार यांनी कौतुक करत अभिनंदन केले.
