सोलार इंडस्ट्रीज इंडिया ने उभारलेल्या स्वागत द्वाराचा लोकार्पण सोहळा संपन्न

राजुरा तालुक्यातील वरूर रोड गावालगत असलेल्या सोलार इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेडने सामाजिक दायित्व निधीतून गावाच्या प्रत्यक्षदर्शीनी उभारलेल्या स्वागत द्वाराचा लोकार्पण सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्या हस्ते करण्यात आले. …सोलार इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेडने यापुर्वी सुध्दा अनेक सामाजिक कार्यासाठी पुढाकार घेतला आहे. कोरोनाच्या महामारीत मजुरांना अन्नधान्याच्या किट वाटप केल्या आहे व कोविड सेंटर साठी बेडची व्यवस्था केली आहे.तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत केली आहे. त्यांच्याकडे असलेल्या सामाजिक दायित्व निधीतून वरूर गावासह शाळेला उपयोगी साहित्य दिले आहे.या सोबतच विविध सामाजिक उपक्रम राबवून मदतीचा हात दिला आहे.याच निधी अंतर्गत वरूर गावाच्या प्रत्यक्षदर्शींनी स्वागत द्वार उभारले आहे.याच द्वाराचे लोकार्पण माजी नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला सोलार इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेडचे सिनियर मॅनेजर वसंत वरारकर,जिल्हा परिषद सदस्य मेघा नलगे,संवर्ग विकास अधिकारी किरण धानवाडे, पं स उपसभापती मंगेश गुरनुले,ग्रामपंचायत प्रशासक आनंदराव नेवारे, सचिव सीताराम मरापे,पंचायत समिती सदस्य रामदास पुसाम,माजी सरपंच संगीता कोडपे,देवाजी धोंगडे,रमेश काळे,नारायण थिपे व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.