
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
जि.प. यवतमाळमध्ये जि.प. माध्यमिक शाळा ३३ आहे पण रिक्त पदांमुळे शिक्षकच उपलब्ध नाही .प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्यानंतर शिक्षकांची पदे रिक्त असल्यामुळे गुणवत्तेवर खूप परिणाम झाला.परिणामी पालकांचा टीसी मागण्याचा आंदोलन करण्याचा व शाळेला कुलूप लावण्याचा कल वाढला. यासाठी जि.प. माध्यमिक शिक्षक संघ यवतमाळ यांनी जि.प.मा. मुख्यकार्यकारी अधिकारी व मा. शिक्षणाधिकारी यांना निवेदने दिली.पण प्रशासनाने अजिबात दखल घेतली नाही. विद्यार्थी गुणवत्तेसाठी आग्रही असणार्या जि.प. सदस्या तथा शिक्षण समिती सदस्या सौ. प्रितीताई काकडे यांनी तेवढ्याच तळमळीने व प्रभावी पणे
माहे ऑगस्ट व सप्टेंबर मध्ये पार पडलेल्या शिक्षण समितीच्या मीटिंगमध्ये सर्व विषय मांडले तथा त्या संदर्भात पत्रही दिले . पण प्रशासना कडुन कुठलाही निर्णय झाला नाही.
अखेर दि.२२-१०-२१ रोजी झालेल्या
शिक्षण समिती मधे सौ. प्रितीताई काकडे यांनी अत्यंत अभ्यासपुर्वक प्रखरपणे बाजु मांडली व घड्याळी तासिका शिक्षक कसे आवश्यक आहे ?? हे पटवुन दिले.पण प्रशासन या बाबत उदासिन होते . आपल्याला अशी तरतुद करता येत नाही असे शिश्रण सभापती यांनी सांगितले. प्रशासनाची असंवेदनशीलता पाहुन सौ.प्रिती काकडे गंभीर व भाऊक झाल्या पण तेवढ्याच तत्परतेने ,आक्रमकतेने प्रशासनाला पटवुन दिले.आपण सेसफंडातुन अनेक योजना राबवितो.त्याचा आकडा थोडा थोडका नाही.कोरोना परिस्थिति मुळे सर्व शाळा बंद असतांना टेबल खुर्ची चटई दप्तर खरेदी साठी २०-२५ लाखाची तरतुद करु शकता पण आता शाळा सुरु असुनही शिक्षकांची आवश्यकता असतानाही तुम्ही घड्याळी तासिका शिक्षकची तरतूद करु शकत नाही. प्रशासनाला या विषयाचं गांभीर्यच नाही आणि काम करण्याची मानसिकताही नाही असा आरोप त्यांनी यावेळी केला.सभागृहातील इतर सदस्यांनी सौ.प्रीती काकडे यांना साथ देत सेस फंडातून तरतूद करावी असा आग्रह धरला . अखेर
एका अधिकार्याने आपण १० ते १२ लाखांपर्यंत तरतूद करु शकतो असे सभागृहात सांगितले. सेस फंडातून १० लाखांची तरतूद , घड्याळी तासिका शिक्षक नेमणुक ३ नोव्हेंबर २०२१ पर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. सर्व सदस्यांनी व सभागृहाने सौ.प्रितीताई काकडे यांचे अभिनंदन केले. सौ.प्रितीताई काकडे यांच्यामुळे माध्यमिक शाळेला घड्याळी तासिका शिक्षक मिळण्याचा व इतर प्रश्न सोडविण्याचा मार्ग मोकळा झाला.
अध्यक्ष, सर्व सदस्य, जि.प .माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ यवतमाळ तर्फे सौ प्रितीताई काकडे मॅडम यांचे अभिनंदन व जाहीर आभार व्यक्त करण्यात आले .
