
शहरातील गोकुल नगर भागात खड्ड्यातील पाण्यात बुडुन सुकनेगाव येथिल एका ईसमाचा म्रुत्यु झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.
दौलत देवराव पुसनाके (३६)रा.सुकनेगाव असे म्रुतकाचे नाव असल्याची माहिती मिळाली आहे. दौलत हा गावातीलच एका शेतकऱ्यांकडे सालगडी म्हणुन शेतीचे काम करित होता. दि.२८ ऑगस्टला गटाचे पैसे भरण्याकरीता म्हणुन दौलत वणी येथे आला होता अशी माहिती मिळाली आहे. परंतु पैसे बँकेत भरुन दौलत गावाकडे न जाता रात्री ८ ते ९ वाजताचे सुमारास गोकुल नगर परिसरातील निर्गुडा नदीच्या भागाकडे असलेल्या परिसरात आला व त्या भागात असलेल्या भल्या मोठ्या खड्याकडे जात असतांना काही लोकांनी त्या खड्डयाकडे जाण्यास त्याला मनाई केेली असता दौलत खड्डयाकडे गेला आणि त्या खड्यातील पाण्यात पडुन बुडुन त्याचा म्रुत्यू झाला अशी माहिती मिळाली आहे. परंतु दौलत हा गोकुल नगर परिसरात कशाला गेला असावा असा प्रश्न उपस्थित होतो आहे. दौलत च्या पाठिमागे पत्नी, एक मुलगी व एक मुलगा आहे. या घटनेची माहिती पोलीसांना मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले व घटना पंचनामा करून म्रुत्युदेह शवविच्छेदनासाठी वणीच्या ग्रामिण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार श्याम सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार वासुदेव नारनवरे करीत आहेत.
