

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
१००%लसीकरण २८/१०/२०२१
शासनाचे विशेष अधीकारी व उपविभागीय अधिकारी शैलेशजी काळे, यांनी कीन्ही जवादे हे गाव १००%कोरोना लसीकरणात राळेगाव तालुक्यातुन पहिले आल्या बद्दल सरपंच सुधीरभाऊ जवादे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला यावेळी तहसीलदार डाॅ कानडजे, गटविकास अधिकारी पवार साहेब तालुका आरोग्य अधिकारी डाॅ पाटील, अनेक महसूल अधिकारी, कर्मचारी, ग्रामसेवक, यांनी अभिनंदन केले.
“१००%लसिकरण होण्यासाठी आशावर्कर, ग्रामपंचायत कर्मचारी, आरोग्य विभागाचे कर्मचारी,यांची मेहनत व गावकऱ्यांचा विश्वास “यामुळे हे शक्य झाल्याचे सरपंच सुधीरभाऊ जवादे यांनी सांगितले.
“कीन्ही जवादे गावाचा आदर्श घेऊन इतर गावांनी लसीकरण चावेग वाढवतील”असा विश्वास शैलेशजी काळे उपविभागीय अधिकारी यांनी व्यक्त केला.ग्रामपंचायत
सचीव सुनीलजी येंगडे, कर्मचारी पुंडलिकराव लोणबले, मारुतीजी विठाळे, भाग्यश्रीताई खैरकार , आशावर्कर सुशीलाताई सुनील मेश्राम यांनी विशेष परिश्रम घेतले
