Cmpl चड्डा कंपनीत कामगारांवर होत असलेल्या अन्याया विरोधात स्थानीक कामगारासह छावा क्षात्रवीर सेनेचे बसले उपोषणाला.

राजुरा: Cmpl चड्डा कंपनीत कामगारांवर होत असलेल्या अन्याया विरोधात साखरी, पौनी, राजुरा मधे स्थानीय मराठी कामगार उपोषणाला बसले आहे. कंपनी मध्ये ८०% मराठी कामगार घ्यावे असा कायदा आहे पन तसे अमलबजावनी होत नाही म्हणुन स्थानिक मराठी युवकांसोबत सतत अन्याय होत आहे. १२ तास ड्युटी करून ८ तासांचे ११००० हजार पगार देतो तो कामगार किमान वेतन नुसार देत नाही. त्यांचे ८ तासाचे २६ दिवसाचे वेतन २४००० हजार रु. वेज बोर्ड नुसार आहे ते देत नाही त्यामुळे कामगार आज दिनांक १ नोव्हेंबर पासून शरद टोंगे ,किसन मड़ावी, प्रफुल गौरकार, अमित जगताप ,विशाल इटलेवार,शेखर पाचभाई अमर गौरकार, प्रवीण लोनगाडगे सुदर्शन देवालकर ,सुनील लांडे ,चिंटू जेउरकार प्रकाश कोडापे ,नरेश पुल्लमवार, प्रमोद थिपे, गुरदास मलचापे ,देवानंद कोडापे ,प्रकाश आत्राम, विजय निवलकर ,अनील शेंडे ,नागेश्वर वांढरे ,नितेश तुरस्कर ,गणेश कोठेकर ,किरण राजनवार ,राजू जेउरकार ,अविनाश गौरकार, श्रवण टेलकापल्लीवार .गजानन हनुमंते ,समस्त कामगार उपोषणाला बसले आहे .
याआधी सुद्धा cmpl चड्डा कंपनीचे काम बंद केले होते मालक स्पॉट वर आले त्यांच्या सोबत बोलले परन्तु ते तसे वागत नाही म्हणून स्थानिक कार्यरत असलेले कामगार पुन्हा उपोषणाला बसले आहे प्रशासन आणि लेबर कमिश्नर आणि राजनेता आमादार,खासदार यांचे लक्ष नाही म्हणून लेबर वर सतत अन्याय होत असते. सौ. संगिता डाहुले, अनिल पारखी, विशाखा राजुरकर, विलास बुराण,सचिन बोबडे यांनी बातचीत केली पन पाहिजे तसे समाधान झाले नाही. मुलांच्या मागण्या मान्य झाल्या नाही . त्यामुळे आंदोलन चालू राहणार जोपर्यंत मराठी कामागाराला न्याय मिळत नहीं तोपर्यंत उपोषण चालू राहणार कंपनीच्या डस्ट मुळे शेतीचे नुकसान होत आहे. त्यांना नुकसान भरपाई कंपनीने तेथील लोकांना दयायला पाहिजे प्रशासन आणि तेथील निवडून दिलेले प्रतिनिधि यांनी या गंभीर ज्वलंत समस्याकडे लक्ष दयायला पाहिजे त्या प्रसंगी छावा संघटनेचे सौ संगिता डाहुले महिला प्रदेशअध्यक्ष, अनिल पारखी विदर्भ अध्यक्ष, विशाखा राजुरकर कामगार महिला विदर्भ अध्यक्ष, विलास बुराण जिल्हा अध्यक्ष यवतमाळ , अजय धांडे शहर अध्यक्ष मारेगाव आणि स्थानिक छावा क्षात्रवीर सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.