हिरवा अंकुर फाउंडेशन तर्फे नाशिक मनपा हद्दीतील शाळकरी विद्यार्थ्यांसाठी किल्ले बनवा स्पर्धा

हिरवा अंकुर फाउंडेशन तर्फे नाशिक मनपा हद्दीतील शाळकरी विद्यार्थ्यांसाठी दोन ते 16 नोव्हेंबर कालावधीत किल्ले बनवा स्पर्धा आयोजित केली आहे स्पर्धकांच्या घरी जाऊन किल्ले परीक्षण करण्यात येणार आहे स्पर्धा निशुल्क असून नाव नोंदणी करणे अनिवार्य आहे सहभागी होणाऱ्या प्रत्येकला प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल आणि हिरवा अंकुर टीम बाल विभागाचे सदस्यत्व दिले जाईल पहिल्या पाच जणांना रोख 5001,3001, 2501,2001 आणि एक हजार एक रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. खास सोहळ्यात पालकांसह विद्यार्थी विद्यार्थिनींचा सत्कार आणि बक्षीस वितरण होईल स्वनिर्मिती किल्ल्यांच्या प्रकृतीचे ऑनलाइन जून द्वारे जनतेसाठी प्रदर्शन ठेवण्यात येणार आहे नोंदणीसाठी प्रशांत लोणारी 7796886134 आणि प्रियंका वेदपाठक 7387289393 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे