
नाशिकच्या समाज कल्याण विभाग मध्ये आज नाशिक अँटिकरप्शन विभागा ने कारवाई करून वर्ग एक च्या अधिकारी आणि त्यांचे दोन सहाय्यक यांना रंगेहात पकडले.नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील आगासखिंड या गावाचे उपसरपंच श्री लहानुजी बरकले यांनी लाचलुचपत खात्याला माहिती देऊन आपल्याकडून जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी 70 हजार रुपयांची मागणी केली जात असल्याचे लाचलुचपत खात्याला कळवले आणि या माहितीच्या आधारे लाचलुचपत खात्याने सापळा रचला आणि क्लास वन अधिकारी तसेच यांचा चालक आणि सहाय्यक ला या सापळ्याद्वारे रंगेहात ताब्यात घेतले. श्री बरकले हे मागील अनेक महिन्या पासून समाजकल्याण कार्यालयाच्या चकरा मारत होते सर्व कागदपत्रे देऊन देखील कार्यालय अनावश्यक त्रुटी काढून नेहमीच बरकले यांना परत पाठवत होते याचाच कंटाळा आल्याने बरकले यांनी चालकाशी गप्पा मारत असतांना चालकाने सुरवातीला 50 हजारात तुमचे काम होईल असे सांगून बरकले यांच्या कडून पैशाची मागणी केली आणि वेळेवर पून्हा 20 हजार वाढवून एकूण 70 हजारांची मागणी केली.
ही कारवाई झाल्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या अनेकांनी बरकले यांचे आभार मानून आपल्यालाही अशाच प्रकारे त्रास दिला गेल्याचे मत व्यक्त केले.
