एस टी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना वरोरा चा पाठिंबा

आज मनसेचे अध्यक्ष मा राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार एस टी महामंडळचे राज्य शासनातं विलगीकरणच्या मागणीसाठी आंदोलनात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात सहभागी होत एस टी कर्मचाऱ्यांना सातत्याने विलंबाने मिळणारे वेतन,आर्थिक समस्या मुळे 38 हुन अधिक कर्मचाऱ्यांनी केलेल्या आत्महत्या आणि महामंडळाच्या गैर कारभारा मुळे कर्मचाऱ्यांच्या मनात निर्माण झालेला अविश्वास या गोष्टी मुळे एस टी कर्मचाऱ्या मधील असंतोषाचा भडका उडाला आहे .एस टी कर्मचाऱ्यांच्या सर्व समस्या ,पगारात विलंब ,कर्मचाऱ्यांचे शासनात विलगिकरन या सर्व समस्या सोडवण्यासाठी प्रत्येक ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या समर्थनात उभे राहू असा शब्द मनसे तालुकाध्यक्ष वैभव डहाने यांनी दिला. एस टी कर्मचारी कामगार जगला तर एस टी जगेल हे समजून घेण्याची गरज आहे त्यामुळे पत्राद्वारे मनसेच्या वतीने तालुकाध्यक्ष वैभव डहाने यांच्या नेतृत्वात कर्मचाऱ्याच्या संपाला पाठिंबा देताना तालुकाध्यक्ष वैभव डहाने मुज्जमील शेख ,राहुल खारकर ,कल्पक ढोरे, प्रशांत बदकी, राहुल लोणारे , कुणाल गौरकार , शरद पुरी ,अनिकेत पुरी ,प्रितम ठाकरे,चेतन निकोडे ,संदेश तामगाडगे,प्रतीक मुडे,आशिष मित्तपल्लीवार ,विकी येरणे , रोहित चिंचोलकर पदाधिकारी,महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते