माजरी गावाच्या विविध समस्या सोडविण्यासाठी ग्राम पंचायत माजरी ला निवेदन

माजरी गावातील मुख्य रस्त्यांवर दिवसभर जड वाहनांची वाहतूक सुरू असते त्यामुळे धुळीचे प्रमाण वाढून त्वचा रोग तसेच श्वसनाचे आजार वाढत असल्याने या रस्त्यांवर दररोज पाण्याच्या टँकर ने पाणी मारावे जेणेकरून धूळ उडणार नाही तसेच माजरी बाजार रोड च्या दोन्ही बाजूला असलेल्या नाल्या भूमिगत करण्यात याव्या यासाठी माजरी गावातील जागरूक नागरिक गणेश खरवार यांनी सचिव ग्राम पंचायत माजरीला ला निवेदन देत लवकरात लवकर प्रश्न मार्गी लावा अशी विनंती केली .