
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
कळंब तालुक्यातील तिरझडा येथील युवक सुरेश शामराव पवार (34) यांचे माथा वस्तीत घर आहे याचे दि.15 नोव्हेंबर 2021 रोजी रात्री 9:30 वाजताचे दरम्यान अज्ञात पाच ते सहा युवकानीं घरासमोर चारचाकी पांढऱ्या रंगाचे आर्टिगा कार उभी करून घरातून नेऊन अपहरण केल्याची घटना घडली
प्राप्त माहिती नुसार कळंब तालुक्यातील तिरझडा येथील सुरेश शामराव पवार (34) यांचे माथा वस्तीत घर आहे याचे दि.15 नोव्हेंबर ला रात्री 9:30 वाजताचे दरम्यान अज्ञात पाच ते सहा युवकानीं घरासमोर चारचाकी पांढऱ्या रंगाचे आर्टिगा वाहनाने ज्यावर ‘ज्ञानेश्वरी’ असे लिहलेले होते. ही गाडी घरासमोर उभी करून सुरेश पवार यांच्या घरात आत जाऊन व त्यांच्या पत्नी समोर बळजबरीने त्याला उचलून गाडी मध्ये टाकले.
सदर घटनेची तक्रार अपहरण झालेल्या ची पत्नी सौ. शालिनी सुरेश पवार (25)हिने 15 नोव्हेंबर च्या रात्रीस पोलीस स्टेशन कळंब ला दिल्याने कलम ४५१ , ३६३,३४ चा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अजित राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किशोर मावसकर जामदार सुरेश झोटिंग करीत होते व दि. 17/11/2021 रोजी राळेगाव तालुक्यातील वडकी पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या कारेगाव वर्धा नदी च्या पात्रात मृतदेह तरंगत असल्याची माहिती मिळताच वडकी पोलीस स्टेशन येथील कर्तव्यदक्ष ठाणेदार विनायकराव जाधव साहे, भोंगाडे साहेब, विकास धडसे, विलास जाधव विकी धावतीवर रमेश मेश्राम रमेश आत्राम हे पोचले व तिरझडा येथील पवार कुटुंबियांना बोलाविण्यात आले नंतर मृतकाच्या भावाने सांगितले की हा माझाच भाऊ आहे व मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेहाला राळेगाव येथील सरकारी दवाखाना येथे पाठविण्यात आले. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हा मर्डर असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे मृतकाच्या टावेलानी जबडा बांधून मारल्याचे निष्पन्न होत आहे तरी अशा घटना यवतमाळ जिल्ह्यात का होत आहे याकडे एस पी दिलीप भुजबळ पाटील यांनी विशेषता लक्ष द्यावे जनसामान्यात चर्चा आहे.
