वाघाचा इसमावर प्राणघातक हल्ला सुदैवाने जीवीत हानी नाही,पोंभूर्णा तालूक्यात वाघाची दहशत

आठवडाभरात सलग तिसरी घटना

पोंभूर्णा तालूक्यात वाघाने धुमाकुळ घातला असून जनजीवन भयभीत झाले आहे काल दि.२४/११/२०२१ रोज बुधवारला कसरगठ्ठा येथील बेबीबाई हनुमान धोडरे हि महिला वाघाच्या हल्यात मृत पावली या घटणेला चोवीस तासाचा कालावधी हि झाला नाहि तर आज दिनांक २५/११/२०२१ गुरूवारला सायंकाळी ३:३० च्या सुमारास पोंभूर्णा चिंतलधाबा मुख्यमार्गावर स्वामी विवेकानंद कॉन्व्हेंट जवळ राहुल चव्हान वय ३० वर्ष मु.चनकापूर या तरुणावर जंगलात कक्ष क्रमांक ९५ येथे दबा धरून बसलेल्या वाघाने तरूणावर हल्ला चढवून जखमी केले परंतु सदर तरूणाच्या समयसुचकतेने त्या तरूणाचे प्राण वाचले घटणेची माहिती वनपरीक्षेत्राला कळताच वनक्षेत्रअधिकारी घटनास्थळी दाखल झाले घटणेचा पंचनामा करून जखमी तरूणाला औषधोउपचारासाठी प्राथमीक आरोग्य केंद्र पोंभूर्णा येथे दाखल करन्यात आले असून पुढील तपास वनक्षेत्रअधिकारी करीत आहेत या नरभक्षी वाघाला कधी जेरबंद करतात याकळे सर्वांचे लक्ष लागून आहे