
२६ नोव्हेंबर हा संविधान दिन देशभरातील शाळा, महाविद्यालयांमध्ये उत्साहात साजरा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळांमध्ये ‘माझे संविधान,माझा अभिमान’ उपक्रम राबविण्यात आला आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि “पाहणारे डोळे आणि मदतीचे हात” बहुद्देशीय सामाजिक संस्था, उमरी पोतदार यांच्या विद्यमाने भारतीय संविधान दिवस साजरा करण्यात आले. सर्व उपस्थित शिक्षक, विद्यार्थी आणि संस्थेचे सर्व सदस्यांनी सामूहिकरीत्या संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावा म्हणून विद्यार्थ्यांना भाषण स्पर्धा आयोजित केली गेली होती. विद्यार्थ्यांनी संविधान या विषयावर आप आपले मत मांडले. कोरोनाच्या पादुर्भावामुळे शाळा बंद होत्या आणि त्यामुळे शाळेतील परिसरात लहान लहान झाडे, कचरा परिसर अस्वच्छ असल्यामुळे विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी परिसर स्वच्छ करून देण्यात आला.त्या परिसरात मुलं मुली खेळतील शिकतील आणि स्वतःला घडवतील या मानस हेतूने शाळेतील परिसर स्वच्छ करण्यात आला. यावेळी उपस्थित शाळेतील शिक्षकवृंद, विद्यार्थी आणि संस्थेचे सदस्य.
