
चंद्रपुर:-महाकाली कॉलरी रय्यतवारी पुलाचे कडेला महानगरपालीकेच्या घंटागाडीने एका अज्ञात व्यक्तीला जोरदार धडक दिल्याने तो व्यक्ती रस्त्याच्या कडेला रक्ताच्या थारोळ्यात पडला होता मात्र त्याकळे कोणीहि लक्ष देत नव्हते अशातच घटणास्थळावर उपस्थीत एका इसमाने मनसेचे रुग्ण मित्र क्रिष्णा गुप्ता यांना भ्रमणध्वणी वरून संपर्क करून या घटणेची सविस्तर माहिती दिली असता मनसे रुग्णमित्र क्रिष्णा गुप्ता यांनी क्षणाचाहि विलंब न करता लगेच घटनास्थळी पोहचले. सदर इसमाची गंभीरता लक्षात घेऊन मनसेचे दुसरे रुग्नमित्र प्रविण शेवते यांना हि घटनास्थळी पाचारण करण्यात आले तेव्हा दोन्ही मनसेच्या रुग्णमित्रांनी सदर व्यक्तीला औषधो उपचारासाठी जिल्हासामान्य रूग्नालय चंद्रपूर येथे दाखल करन्यात आले असून रूग्नाची प्रकृती सध्या सुरळीत असल्याचे डॉक्टरांकडून समजले महानगरपालीकेच्या घंटागाडीने एका निष्पाप व्यक्तीचा जीव घेतला असता तर मोठा अनर्थ झाला असता प्रभागातून घंटागाळी नेत असतांना वेग कमी असावे अशी मागणी परीसरातील नागरींकाकडून केली जात आहे तसेच मनसेचे रूग्ण मित्र क्रिष्णा गुप्ता व प्रविण शेवते तात्काळ घटनास्थळी पोहचून वेळेवर औषधोउपचार झाले नसते तर सदर व्यक्तीची जीवीतहानी नाकारता येत नाही. परीसरातील नागरींकाकडून मनसे रुग्नमित्र क्रिष्णा गुप्ता व प्रविण शेवते यांचे कौतुक केले जात आहे.
