
वरोरा तालुक्यातील मोखाडा या गावात मागील काही दिवासाआधी एक वाघ विहिरीत पडल्याची घटना ताजी असताना काल चिकणी गावात संजय दादाजी ताजने यांच्या शेतातील गाईवर हल्ला करून गाई ला ठार केले .या भागांत वाघाचा वावर असल्याने शेतकऱ्यांमध्ये मात्र भीतीचे वातावरण आहे.सध्या शेतीचा हंगाम असल्याने कापूस वेचण्याकरिता मजूर वर्ग शेतात राबताना दिसत आहे अश्यातच वाघाचा वावर असल्याने मजूर शेतात जाण्यासाठी धजावत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.
वरोरा तालुक्यात वाघोबाचे दर्शन , शिकारीच्या शोधात वाघ पडला विहिरीत
वरोरा तालुक्यातील आल्फर आणि मोखाडा रस्त्यावरील एका शेतात असलेल्या विहिरीत आज पट्टेदार वाघ पडून असल्याचे दिसून आले.शिकारीच्या शोधात हा वाघ इथे आला असावा असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
मोखाडा या भागात असलेल्या शिरपाते यांच्या शेतात असलेल्या विहिरीत हा वाघ पडला असून या बाबतची माहिती वनविभागाला देण्यात आली आहे.विहिरीत वाघ असल्याची वार्ता वाऱ्यासारखी पसरली त्यामुळे आजूबाजुंच्या गावातील नागरिकांनी एकच गर्दी केली. वनविभाग घटनास्थळी दाखल होत वाघाला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले आहे.
गावकऱ्यांनी वाघाला पाहण्यासाठी एकच गर्दी केल्याने वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना वाघाला बाहेर काढण्यात अपयश येत होते.अखेर एक खाट विहिरीत सोडत वाघाला बाहेर काढण्यात यश आले .या वाघोबाच्या दर्शनाने मात्र या भागातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण दिसून आले होते.
वरोरा तालुक्यातील मोखाडा या गावात 2 दिवस आधी विहिरीत वाघ पडला होता. वनविभागाच्या अथक प्रयत्नांनंतर तो वाघ विहिरी बाहेर काढण्यात यश आले.
तर आज भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा या गावातील एका शेतात वाघिणीचा मृतदेह आढळून आला आहे.त्यामुळे खळबळ उडाली आहे.मृत वाघिणीचे वय अंदाजे 3 वर्ष आहे .शेतातील कुंपणाच्या करंट मुळे मृत्यू झाला .वनविभागाची चमू घटनास्थळी दाखल होत पुढील तपास सुरू केला होता.
