
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
दिग्रस येथील कार्यकर्ता तथा वसंत प्रतिष्ठाणचे अध्यक्ष विशाल भाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वात अपंग,श्रावणबाळ व निराधारांच्या विविध मागण्यासाठी विशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले.
दरम्यान दिव्यांग,श्रावणबाळ व निराधारांच्या पगार वेळेवर होत नाही,काहिना तीन-तीन चार महिने पगार होत नाही.तर ऐवढ्या महागाईमुळे दिव्यांग,निराधार व श्रावणबाळांना मिळणारे अनुदान खुपचं कमी असून १००० रू.दोन वेळचे चहाचेसुद्धा खर्च भागत नसून महागाईमुळे लाभार्थ्यांना उपासमारीची वेळ आली आहे. कधीच बॅंकेत वेळेवर पगार जमा होत नाही. त्यामुळे येण्याजाण्यात होणारा त्रास व तीनशे ते पाचशे रुपये सहज खर्ची होतात.व उरलेल्या पाचसे रुपयांत दोन तीन महिने कसे गुजरान करावे.असे प्रश्न त्यांना पडला आहे. या करिता शासनाने कमीत कमी ३००० रु.प्रती माहे वाढवण्यात यावे. अपंग,निराधार,श्रावणबाळाच्या लाभार्थ्यांना अंत्योदय योजनेत सरसकट सामावून घेवून प्रतिकुटुंब ३५ किलो धान्य देण्यात यावे तसेच उत्पन्नाची अट १लाख रु पर्यंत वाढविण्यात यावी आणि महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्रत्येकांच्या खात्यात पैसे जमा करण्यात यावे अशा विविध मागण्यासाठी विशाल चव्हाण यांच्या नेतृत्वात बिरसामुंडा चौक वरून विशालमार्चा काढण्यात आले.
यात दिग्रस तालुक्यातील वेगवेगळ्या गावातील हजारो दिव्यांग,निराधार आणि श्रावणबाळचे लाभार्थी सहभागी झाले होते.या मोर्चाचे नेत्रृत्व सामाजिक कार्यकर्ते तथा वसंतप्रतिष्ठाणचे अध्यक्ष श्री विशाल चव्हाण यांनी केले तसेच या मोर्चात वसंत प्रतिष्ठाणचे पवन आडे,सुभाष चव्हाण,गोपाल जाधव,राजेश आडे,,जय चव्हाण,योगेश,रामेश्र्वर राठोड,तसेच साखरा,खेकडी,मोख,रामगांव, लिंगी वाई,तिवरी,आमला,धानोरा येथील
शेकडो दिव्यांग,श्रावणबाळ व निराधार लाभार्थी व कार्यकर्ते सहभागी होते.
