
वेगळ्या विदर्भ राज्याची मागणी 1905 पासूनची आहे असे असतांनाही विदर्भ राज्य हे केंद्र सरकारच्या विचाराधीन नसल्याचे चार दिवसांपूर्वी केंद्राचे राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी संसदेच्या सभागृहात (बरळले) सांगितले याचा विदर्भ राज्य आंदोलन समिती वणीच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला व केंद्र सरकारचे गृहमंत्री नित्यानंद राय व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात येत असताना विदर्भवाद्यांकडून पुतळा पोलीस प्रशासनांनी हिसकावून घेतला.
वास्तविक पाहता शासनाने नेमलेल्या दार आयोग, जे.व्ही.पी.कमिटी, राज्य पुनर्रचना आयोग,संग्राम समिती व इतर समित्यांनाही विदर्भ राज्य सक्षम राहणार असल्याचे अहवालही दिले आहे आणि भाजप ने तर 1997 सालीचा भुवनेश्वर येथील अधिववेशनात ठराव पारित करून विदर्भाची मागणी केंद्राला केली आहे.
तसेच निवडणुकीपूर्वी 2014 साली दिल्लीत जर भाजप चे सरकार आले तर तात्कालीन भाजप चे अध्यक्ष नितीन गडकरी यांनी वेगळे विदर्भ राज्य देण्याचे लेखी आश्वासनही दिले होते
आजही विदर्भ आंदोलन समितीचे अध्यक्ष वामनराव चटप यांचे नेतृत्वाखाली स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी प्रखर आंदोलन सुरूच आहे हे विशेष परंतु आज सत्ता आल्यावर ते सर्व नेते सर्व आश्वासने विसरली आहे केंद्रीय राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी तर कोणतीही माहिती करून न घेता असा प्रस्तावच नव्हता म्हणून नामनिराळे झाले आहे त्यामुळे यांच्या पुतळ्याचे प्रतिकात्मक दहन म्हणून निषेध करण्यात आला यावेळी पोलीस प्रशासनानी पुतळा हिसकावून घेतला असला तरी विदर्भावाद्यांनी आंदोलनाच्या विविध घोषणा देऊन निषेध नोंदवला यावेळी यवतमाळ जिल्हा प्रमुख प्रा.पुरुषोत्तम पाटील,कोर कमिटी सदस्य रफिक रंगरेज,युवक यवतमाळ जिल्हा अध्यक्ष राहुल खारकर,जिल्हा संघटक राजू पिंपळकर, वणी शहर अध्यक्ष संजय चिंचोळकर,मारेगांव तालुका अध्यक्ष राहुल झट्टे,सिद्धार्थ टाकसंडे, पुंडलिक पथाडे,शालिनी रासेकर,अलका मोवाडे,कलावती क्षीरसागर यासह विदर्भवादी उपस्थित होते
