

उस्मानाबाद प्रतिनिधी बालाजी भांडवलकर~
युवाशक्ती ग्रामविकास संघटना महाराष्ट्र राज्य उस्मानाबाद जिल्हा नियोजन समिती तर्फे दिनांक २०/ १२/२०२१ रोजी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब जिल्हा परिषद कार्यालय उस्मानाबाद यांना लेखी स्वरूपात निवेदन उस्मानाबाद जिल्हा नियोजन समिती अध्यक्ष श्री दिलीप गायकवाड तसेच सोशल मीडिया प्रसिद्धीप्रमुख दत्तात्रय मरगा आढाव, जिल्हा नियोजन प्रमुख श्री प्रवीण वाल्मीक भोसले तसेच अभिजीत बळीराम अडसूळ कोषाध्यक्ष व सौ सुनिता अनिल वाघमारे सहकोषाध्यक्ष जिल्हा नियोजन समितीचे सर्व सदस्य यांच्या वतीने उस्मानाबाद येथे मुख्य कार्यकारी अध्यक्ष साहेब यांना निवेदन देऊन जिल्ह्यातील ग्रामसेवक ग्रामपंचायत कार्यालयामध्ये वेळेवर उपस्थित न राहिल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करून विविध प्रकारच्या शासकीय योजनांची वेळेवर माहिती मिळत नसल्याने पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांना त्या योजनेपासून मुदतीत माहिती न मिळाल्याने वंचित राहावे लागत आहे. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांचे लक्ष वेधून होत असलेल्या सर्वसामान्य जनतेला त्रासातून मुक्ती मिळण्यासाठी संघटनेने जिल्ह्यातील ग्रामसेवकांनी वेळेत ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित राहून नागरिकांना शासकीय सेवा द्यावी म्हणून महत्त्वाचे पाऊल उचलले आहे .सदरील प्रकरणी गांभीर्याने लक्ष देऊ असे मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांनी आश्वासित केले . तरी युवाशक्ती ग्रामविकास संघटन महाराष्ट्र राज्य व उस्मानाबाद जिल्हा युवाशक्ती ग्रामविकास संघटन सर्वसामान्य नागरीकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहुन त्यांच्या अडचणी व प्रश्न सोडवण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असेल महाराष्ट्रातील व उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व जनतेला ग्राम विकास संघटन आव्हान करत आहे .ग्रामविकास कार्यामध्ये आपण संघटनेला व आपल्या अडचणी मध्ये संघटना आपणास शक्य होईल तेवढे नक्कीच सहकार्य करेल या सहकार्याच्या माध्यमातून गावचा सर्वांगीण विकास करणे हा हेतू खऱ्या अर्थाने साध्य होईल .
