
प्रतिनिधी:- चेतन एस.चौधरी
दोंडाईचा नगरपालिका व आमदार जयकुमार रावल यांच्या निधीतून शहरात करण्यात आलेल्या विविध विकास कामांचे लोकार्पण दिनांक २४ डिसेंबर रोजी केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह व आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते होणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज , वीरशिरोमणी महाराणा प्रताप व दोंडाईचा संस्थानचे शेवटचे राजे दौलतसिंह यांच्या पूर्णकृती पुतळ्याचे तसेच १६ कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या राजपथ मार्गाचे व इतर विकास कामांचे लोकार्पण होणार आहे.
यावेळी खासदार सुभाष भामरे, खा.हिना गावित, आमदार जयकुमार रावल तसेच इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
