
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
सरकारी नोकऱ्यामध्ये आरक्षण मिळावे व मुस्लीम समाजाच्या इतर मागण्यासाठी आज दि.२४ डिसेंबर २०२१ रोजी दुपारी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे लेखी निवेदन सादर करण्यात आले.मुस्लीम सेवा संघाच्या स्थानिक शाखेतर्फे यासाठी पुढाकार घेण्यात आला. महाराष्ट्रासह देशातील इतर भागात मुस्लीम समाजाची शैक्षणिक,आर्थिक,राजकीय व सामाजिक परिस्थिती अत्यंत हालाखीची असल्याचे शासनाने नेमून दिलेल्या व खाजगी अहवालांनी वेळोवेळी अधोरेखित केले आहे.तरी देखील शासनस्तरावर त्यांच्यासाठी अद्यापपर्यंत भरीव अशी उपाययोजना करण्यात आली नाही ही वस्तुस्थिती आहे.म्हणून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक सरकारी नोकऱ्यामध्ये आरक्षण द्यावे अशी मागणी मुस्लीम सेवा संघातर्फे करण्यात आली.सोबतच वक्फ बोर्डाच्या मालमत्तेचे संरक्षण मुस्लीम विद्यार्थ्यांसाठी जिल्हा स्तरावर वसतिगृह सुरू करणे मौलाना आजाद आर्थिक विकास महामंडळाला एक हजार कोटी रुपयांचा निधी देणे वक्फ बोर्डाची जागा मुस्लीम समाजाच्या उन्नतीसाठी तसेच शाळा,महाविद्यालय दवाखाने,विवाह भवन,अभ्यासिका { उर्दू घर }आदी विधायक कार्यासाठी उपयोगात आणावी अशी मागणी देखील सदर निवेदनाद्वारे करण्यात आली.दिग्रसचे प्रभारी तहसीलदार सुधाकर राठोड यांनी निवेदन स्वीकारले.यावेळी मुस्लीम सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष अरबाज धारीवाला,नगरसेवक सैयद अकरम,मुहम्मद हुसैन पारेख,हाजी नूर खान पठाणमुहम्मद शरीफ , आसिफ पठाण,ऍड समीर खान,पी पी पप्पूवाले , सैयद इस्माईल,जाकिर अहमद शेख,अफजल खान , फिरोज बेग,फैसल पटेल,फिरोज खानसह इतर पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.
